सरकारने देशात कोरोना व्हायरसविरूद्ध लसीकरणासाठी तयारीला सुरूवात केली आहे. भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोरोना लस देण्याआधी घेण्यात आलेले ड्राय रन यशस्वी झाले आहे. पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये ही मॉक ड्रिलसाऱखी चाचणी घेण्यात आली होती.
चाचणी म्हणून कोरोना लसीकरण सुरू करण्यासाठी येथे निर्धारित पद्धती तपासल्या गेल्या. पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांतील प्रत्येकी दोन जिल्ह्यांत लस ड्राय रन चाचण्या घेण्यात आल्या. कोरोना लस ड्राय रनच्या मदतीने खऱ्या लसीकरणासाठी आवश्यक संपूर्ण तयारी केली जाणार आहे.
देशात कोरोना लस देणं सुरू करण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. भारत सरकारकडून असे म्हटले आहे की आजपर्यंत सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये 7००० हून अधिक जिल्हास्तरीय प्रशिक्षणार्थींच्या सहभागाने कोरोना लसीकरणाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. लक्षद्वीपमध्ये आज प्रशिक्षण देण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून प्रस्तावित लसीकरण योजना जानेवारीपासून सुरु होण्याची शक्यता आहे.
ड्राय रनमध्ये काय काय...कोरोना लसीचे ड्राय रन करताना कोणाला लस दिली जाणार आणि सुरूवातीला कोणाला लस मिळणार नाही. याचा डेटा घेतला गेला. सरकारकडून cowin एपवरद्वारे माहिती अपलोड केली गेली. सरकारने असे म्हटले आहे की जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा पहिल्या टप्प्यात सुमारे 3 कोटी लोकांना लस दिली जाईल. प्रथम ही लस कोणाला दिली जाईल. हे देखील निश्चित करण्यात आले आहे. सर्व प्रथम एक गंभीर आजार असलेले लोक, आरोग्यसेवेतील कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि 50 वर्षांवरील लोकांचा यात समावेश असणार आहे.