गाडीमध्ये मागच्या सीटवर बेल्ट न लावणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. यासंदर्भात आता पोलिसांनी पावती फाडायलाही सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी बुधवारी कारच्या मागच्या सीटवर सीट बेल्ट न लावल्याने 17 लोकांना दंड आकारला आहे. पोलिसांनी या नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात मध्य दिल्लीतील कनॉट प्लेसजवळ बाराखंभा रोडवर एक अभियानादरम्यान ही कारवाई केली आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिेलेल्य माहितीनुसार, मोटार वाहन कायद्याच्या कलम 194B (सुरक्षा बेल्ड वापर आणि मुलांची बसण्याची व्यवस्था) या अंतर्गत सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 17 जणांना दंड आकारण्यात आला आहे. एवढेच नाही, तर ज्यांनी नियमांचे पालन केले नाही, त्यांना 1,000 रुपयांचा दंड आकारला आहे.
हे अभियान टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री (54) यांच्या 4 सप्टेंबरला झालेल्या अपघाती मृत्यूनंतर चालवण्यात आले. पोलिसांच्या मते गाडीत मागे बसलेल्या मिस्त्री यांनी सीट बेल्ट लावलेला नव्हता.