शहरं
Join us  
Trending Stories
1
भावना गवळी, कृपाल तुमानेंना विधानपरिषदेची उमेदवारी; शिंदे गटात नाराजी
2
हाथरस येथील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला, रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठीही उरली नाही जागा   
3
"हिंदूंना विचार करावा लागेल, हा अपमान योगायोग की प्रयोग'; लोकसभेत काय म्हणाले PM मोदी?
4
"आजकल बच्चे का मन बहलाने का काम चल रहा है...", निवडणूक निकालावरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
"सलग तिसऱ्यांदा १०० च्या आत, तिसरा पराभव, तरीही काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम...", मोदींचा खोचक टोला
6
“जयंत पाटील तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"मतदारांनी काँग्रेसलाही जनादेश दिला, तो विरोधी बाकावर बसण्याचा", PM मोदींची बोचरी टीका...
8
“तिसऱ्या टर्ममध्ये तिप्पट वेगाने काम, विकसित भारताचा संकल्प पूर्ण होणार”; PM मोदींची लोकसभेत गॅरंटी
9
"2014 पूर्वी देशात घोटाळ्याचा काळ होता...", लोकसभेतून PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
किंग खानच्या शिरपेचात मानाचा तुरा! 'या' इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुखचा होणार खास सन्मान
11
"अब की बार चोको बार", DMK खासदारानं भाजपच्या घोषणेची उडवली खिल्ली!
12
विश्वास वाढवणारा विश्वविजय! देशाने पाहिलेलं गोड स्वप्न साकार होतं तेव्हा...
13
काँग्रेसमधून निवडून आलेलो याचा मला गर्व, शंका नसावी; अशोक चव्हाणांचे राज्यसभेत वक्तव्य 
14
“मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहीण”; विधान परिषद उमेदवारीवर भावना गवळींची प्रतिक्रिया
15
"राहुल गांधींना 'अभय मुद्रे'संदर्भात ज्ञान नाही; मी त्यांना..."! रामभद्राचार्य स्पष्टच बोलले
16
“राहुल गांधींकडून हिंदू धर्माचा अपमान झाला नाही”; उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट, भाजपावर टीका
17
इस्लाममध्येही असते ‘अभय मुद्रा’? राहुल गांधींचा दावा अजमेरच्या चिश्तींनी फेटाळला, म्हणाले, तसा कुठलाही...
18
लफडे... अन् ब्लॅकमेल! तीन वर्षांपासून ज्या तरुणीने १० लाख वसूल केले, ती पत्नीच निघाली
19
“हीच वेळ आहे, आम्ही गेल्यावर तुम्ही एकत्र येणार का”; मनोज जरांगेंचा मराठा नेत्यांना सवाल
20
Airtel आणि Jioच्या ग्राहकांकडे आज अखेरची संधी, स्वस्तात करा रिचार्ज; उद्यापासून प्लान्स महागणार

मोठी बातमी: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 12:20 PM

अटकेच्या कारवाईमुळे सोरेन यांना मुख्यमंत्रिवरूनही दूर व्हावं लागलं होतं.

Hemant Soren ( Marathi News ) :झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना झारखंड हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कथित जमीन घोटाळ्यात गेल्या अनेक दिवसांपासून हेमंत सोरेन हे अटकेत आहेत. हायकोर्टाकडून आता जामीन मंजूर करण्यात आल्याने सोरेन यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

झारखंडमधील भूमाफियांनी बेकायदेशीरपणे मालकीमध्ये बदल करून जमिनी हडप केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाने काही महिन्यांपूर्वी हेमंत सोरेन यांना अटक केली होती. या कारवाईमुळे सोरेन यांना मुख्यमंत्रिवरूनही दूर व्हावं लागलं होतं. या प्रकरणी ईडीने याआधी १४ जणांना अटक केली होती. यामध्ये आयएएस अधिकारी छवी रंजन यांचाही समावेश आहे.

ईडीने गेल्या वर्षी दावा केला होता की, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पंकज मिश्रा यांना राजकीय संरक्षण आहे, कारण ते झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे राजकीय प्रतिनिधी होते. तसेच, पंकज मिश्रा कथित बेकायदेशीर खाणकामात सहभागी होते. ईडीच्या म्हणण्यानुसार, या मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात ४७ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. यादरम्यान ५.३४ कोटी रुपयांची रोकड, १३.३२ कोटी रुपयांच्या बँक ठेवी, ३० कोटी रुपयांची एक बोट, पाच स्टोन क्रशर आणि दोन ट्रक जप्त करण्यात आले होते.  

दरम्यान, जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने हेमंत सोरेन यांनाही अटक केल्यानंतर देशभरात राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका रंगली होती. आता हायकोर्टाने जामीन मंजूर केल्याने हेमंत सोरेन यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

टॅग्स :JharkhandझारखंडEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयHigh Courtउच्च न्यायालय