मोठी बातमी: महात्मा गांधींबाबत अपशब्द वापरणारा कालीचरण महाराज अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 08:56 AM2021-12-30T08:56:39+5:302021-12-30T09:51:25+5:30

Kalicharan Maharaj News: Mahatma Gandhi यांच्याबाबत धर्म संसदेमध्ये अपशब्द वापरणाऱ्या Kalicharan Maharaj याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी मध्य प्रदेशमधील खजुराहो येथून कालीचरण महाराजाला ताब्यात घेऊन त्याच्यावर अटकेची कारवाई केली. 

Big news: Kalicharan Maharaj arrested for making controversial statement about Mahatma Gandhi | मोठी बातमी: महात्मा गांधींबाबत अपशब्द वापरणारा कालीचरण महाराज अटकेत

मोठी बातमी: महात्मा गांधींबाबत अपशब्द वापरणारा कालीचरण महाराज अटकेत

Next

भोपाळ - महात्मा गांधी यांच्याबाबत धर्म संसदेमध्ये  अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराज याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. कालीचरण महाराजाने महात्मा गांधींवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. तसेच त्याच्याविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. दरम्यान, छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी मध्य प्रदेशमधील खजुराहो येथून कालीचरण महाराज याला ताब्यात घेऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. 

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये दोन दिवसीय धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी परमात्मानंद, संत रामप्रिया दास, संत त्रिवेणी दास, हनुमान गढी अयोध्येचे महंत रामदास, साध्वी विभा देवी, जुना आखाड्याचे स्वामी प्रबोधानंद आणि अकोल्याचे कालीचरण यांच्यासह अनेक संतांनी धर्म संसदेला हजेरी लावली होती. तिथे कालीचरण महाराजाने महात्मा गांधींना शिव्यांची लाखोली वाहिली होती. यावेळी त्याने खालच्या दर्जाचे असे शब्द वापरले आहेत. कालीचरण महाराजाच्या या विधानामुळे वाद पेटला होता. कालीचरण महाराज हा फक्त गांधीजींना शिविगाळ करुन थांबला नाही तर गांधीजींची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेचेही त्याने आभार मानले होते. त्याच्या कृतीचं चक्क कौतुक केलं होतं.

त्यानंतर कालीचरण महाराज याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध टिकरापारा पोलीस ठाण्यात भादंवि कलम २९४ आणि ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला होता. रायपुरचे माजी महापौर आणि सभापती प्रमोद दुबे यांनी कालीचरण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

Web Title: Big news: Kalicharan Maharaj arrested for making controversial statement about Mahatma Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.