मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 07:00 PM2024-06-01T19:00:38+5:302024-06-01T19:01:55+5:30

र्नाटकमध्ये मात्र भाजप पुन्हा एकदा चांगल्या जागा मिळवण्यात यशस्वी ठरत असल्याचं दिसत आहे.

Big News South India exit poll figures out nda india allaince | मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?

मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?

Lok Sabha Election Exit Poll ( Marathi News ) : देशातील लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यांतील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता निकालाआधी विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर येऊ लागले आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार, साडेसहा वाजल्यापासून एक्झिट पोलचे आकडे देण्यास सुरुवात करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात दक्षिण भारतातील राज्यांमधील एक्झिट पोल समोर आले आहेत. या पोल्सच्या अंदाजानुसार, तामिळनाडूत इंडिया आघाडीला यश येणार असून तेलंगणात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. तर कर्नाटकमध्ये मात्र भाजप पुन्हा एकदा चांगल्या जागा मिळवण्यात यशस्वी ठरत असल्याचं दिसत आहे.

अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, कर्नाटकात भाजपला २० ते २२ जागा, जेडीएसला ३ जागा तर काँग्रेसला ३ ते ५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच तामिळनाडूत इंडिया आघाडीला ३३ ते ३७ जागा आणि एनडीएला २ ते ४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. 

एबीपी न्यूज-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, आंध्र प्रदेशात एनडीएला २१ ते २५ जागा आणि इतरांच्या वाट्याला ० ते ४ जागा मिळू शकतात. तेलंगणात एनडीला ७ ते ९ जागा, इंडिया आघाडीला ७ ते ९ जागा आणि इतरांना ० ते १ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तामिळनाडूत इंडिया आघाडीला ३७ ते ३९ जागा आणि एनडीएला ० ते २ जागांचा अंदाज आहे. तसंच केरळमध्ये एनडीला १ ते ३ आणि इंडिया आघाडीला १७ ते १९ जागा मिळू शकतात. 

Web Title: Big News South India exit poll figures out nda india allaince

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.