नवी दिल्ली : देशभरातील २०० विशेष ट्रेन आणि देशातील निवडक १५ मार्गांवरून राजधानी ट्रेन धावत आहे. या ट्रेनचे २९ जूनपासून तत्काळ तिकीट मिळण्यास सुरुवात झाली आहे. प्रवासी ३० जूनच्या प्रवासाचे तिकीट आरक्षित करू शकतात, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद आहे. पण सध्या निवडक १५ मार्गांवर राजधानी विशेष ट्रेन तर आणि १ जूनपासून २०० स्पेशल ट्रेन चालविण्यात येत आहेत. भारतीय रेल्वेने कोरोना संकटात रेल्वे प्रवाशांसाठी तात्काळ तिकीट बुकिंग सेवा सुरू केली आहे. रेल्वेने चालविलेल्या विशेष प्रवासी गाड्यांमध्ये आणि एसी स्पेशल ट्रेन्समध्ये तत्काळ तिकिट बुकिंगची सेवा आजपासून सुरू झाली आहे. मध्य रेल्वेच्या पीआरओ शिवाजी सुतार यांच्या माहितीनुसार ही सुविधा 30 जून आणि त्या नंतरच्या तारखेला धावणा-या गाड्यांसाठी सुरू होईल. तात्काळ तिकिट बुकिंग केव्हा सुरू होईल? रेल्वे प्रवासी 30 जूनपासून प्रवासासाठी तत्काळ तिकिट सुविधेचा लाभ घेऊ शकतील. तत्काळ तिकिटे एसी क्लाससाठी सकाळी 10 पासून आणि सकाळी 11 पासून स्लीपर क्लाससाठी बुक केली जातील. 12 ऑगस्टपर्यंत सर्वसामान्य रेल्वेसेवा बंद करण्यात आल्या आहेत. याबाबत गुरुवारी भारतीय रेल्वेने आदेश दिला आहे. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसह सर्व सामान्य प्रवासी सेवा गाड्या 12 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत, असे या आदेशात म्हटले आहे. नवीन ऑर्डरवरून हे स्पष्ट झाले आहे की ,12 ऑगस्टपर्यंत आता फक्त विशेष गाड्या चालवता येतील.
हेही वाचा
India China Faceoff: ...म्हणून भारत चीनसोबत आरपारच्या लढाईच्या पर्यायासाठी तयार
पेट्रोल अन् डिझेलचे भाव पुन्हा भडकले, जाणून घ्या आजचे दर
CoronaVirus: कोरोनाची तीन नवीन लक्षणं आली समोर, CDCने अपडेट केली यादी
जवानांसोबतच्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा, जून महिन्यातच ३८ अतिरेक्यांना केलं ठार
आजचे राशीभविष्य - 29 जून 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आज जीवनसाथी मिळणार