मोठी बातमी ! बहुचर्चित निठारी हत्याकांडातील दोन्ही दोषींची फाशीची शिक्षा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 12:21 PM2023-10-16T12:21:56+5:302023-10-16T12:23:09+5:30

अलाहाबाद न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत, सुरेंद्र कोळी यास १२ तर मोनिंदर सिंग पंढेर याला २ प्रकरणात देण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द केली आहे.

Big news! The death sentence of the convicts in the notorious Nithari massacre has been cancelled by alahabad high court | मोठी बातमी ! बहुचर्चित निठारी हत्याकांडातील दोन्ही दोषींची फाशीची शिक्षा रद्द

मोठी बातमी ! बहुचर्चित निठारी हत्याकांडातील दोन्ही दोषींची फाशीची शिक्षा रद्द

अलाहाबाद : राजधानी दिल्लीजवळच्या नोएडा येथील निठारी हत्याकांडप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. बडी पायलच्या हत्येप्रकरणी सुरेंद्र कोळी आणि मोनिंदर सिंग पंढेर ह्यांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. मोरल ट्रॅफिकिंग कायद्यान्वये हे दोघेही दोषी आढळले होते. याप्रकरणी सिमरनजीत कौरची भ्रष्टाचार प्रकरणात पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. सीबीआय कोर्टाने १९ मे २०२२ रोजी दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. आता, अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोषी सुरेंद्र कोळी आणि मोनिंदर सिंग पंढेर यांची फाशीची शिक्षा रद्द केली आहे. 

अलाहाबाद न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत, सुरेंद्र कोळी यास १२ तर मोनिंदर सिंग पंढेर याला २ प्रकरणात देण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द केली आहे. उच्च न्यायालयात दोन्ही आरोपींच्या १४ अर्जावर सुनावणी करण्यात आली. सबळ पुरावा आणि साक्षीदार नसल्याने न्यायालयाने दोन्ही दोषींना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द केली आहे. 

२०१७ मध्ये देखील गाझियाबादच्या विशेष सीबीआय न्यायालयाने पिंकी सरकार हत्या प्रकरणात सुरेंद्र कोळी आणि पंढेर यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. यापूर्वी गाझियाबाद येथील विशेष न्यायालयाने व्यापारी मोनिंदर सिंग पंढेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोळी यांना निठारी हत्याकांडात दोषी ठरवले होते. सुरेंद्र कोळी आणि मोनिंदर पंढेर यांना न्यायाधीश पवन कुमार तिवारी यांनी फाशीची शिक्षा सुनावली होती. हे प्रकरण पिंकी सरकारच्या हत्येशी संबंधित आहे. या प्रकरणात पंढेर आणि कोळी हे अपहरण, बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्यात दोषी आढळले होते.

काय प्रकरण आहे?

२००६ मध्ये जेव्हा निठारी प्रकरण उघडकीस आले तेव्हा देशभरात या क्रूर प्रकरणाची चर्चा जोरदार रंगली होती. नोएडातील निठारी गावातील कोठी क्रमांक डी-५ मधून सांगाडे मिळू लागल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान मानवी हाडांचे काही भाग आणि अशी ४० पाकिटे सापडली, ज्यामध्ये मानवी अवयव भरून नाल्यात फेकण्यात आले होते.

कोण आहे सुरेंद्र कोळी?

सुरेंद्र कोळी हा उत्तराखंडचा रहिवासी असून तो मोनिंदर सिंग पंढेरच्या घरी कामाला होता. पंढेर यांचे कुटुंब २००४ मध्ये पंजाबला गेले तेव्हा घरात फक्त पंढेर आणि कोळी राहत होते. मग याच बंगल्यात दोघांनी केलेल्या खून आणि बलात्कारासाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

Web Title: Big news! The death sentence of the convicts in the notorious Nithari massacre has been cancelled by alahabad high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.