Priyanka Gandhi : 2024 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा प्लॅन! उत्तर प्रदेशात प्रियांका या खास रणनीतीवर करणार काम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 11:57 AM2023-02-15T11:57:06+5:302023-02-15T12:01:11+5:30

Priyanka Gandhi : काँग्रेसने एका खास रणनीतीवर काम करत आहे. यासाठी काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी स्वतः मैदानात उतरणार आहेत.

Big plan of Congress for 2024 election Priyanka will work on the special strategy in Uttar Pradesh | Priyanka Gandhi : 2024 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा प्लॅन! उत्तर प्रदेशात प्रियांका या खास रणनीतीवर करणार काम

Priyanka Gandhi : 2024 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा प्लॅन! उत्तर प्रदेशात प्रियांका या खास रणनीतीवर करणार काम

googlenewsNext

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी  (Lok Sabha Election 2024) अद्याप एकवर्षाहूनही अधिक कालावधी बाकी आहे. मात्र सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेसनेही पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने मोहीम सुरू केली आहे. यासाठी पक्ष एका खास रणनीतीवर काम करत आहे. यासाठी काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) स्वतः मैदानात उतरणार आहेत. मार्च महिन्यात त्या उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ मध्ये रॅली करतील.

काँग्रेसमधील नाराज नेत्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू - 
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या लखनौमधील रॅलीपूर्वी पक्षाने मोठी रणनीती आखली असून नाराज नेत्यांच्या मनधरणीसाठी मोहीम सुरू केली आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ब्रिजलाल खाबरी यांनी पक्षावर नाराज असलेल्या नेत्यांच्या तक्रारी दूर करण्याचा कार्यक्रम आखला असून, तो सुरूही करण्यात आला आहे. याशिवाय पक्षापासून दूर गेलेल्या नेत्यांनाही पुन्हा एकदा लाइमलाईटमध्ये आणण्याचा प्लॅनही पक्षाने तयार केला आहे.

प्रियंका गांधी या खास रणनीतीवर काम करणार - 
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रियांका गांधी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात सक्रिय होतील. यासाठी विशेष रणनीतीवर काम केले जाणार आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसची शक्ती वाढविण्यासाठी पक्ष 'हाथ से हाथ जोडो यात्रे'च्या माध्यमाने तरुणांना आणि महिलांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे, याचे नेतृत्व प्रियंका गांधी करतील.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यासोबत चर्चा सुरू -
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चाही करत आहे. यासाठीच उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बृजलाल खाबरी यांनी कानपूरहून मोहिमेला सुरुवात केली आहे. तसेच वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची चर्चा सुरू आहे.

 

Web Title: Big plan of Congress for 2024 election Priyanka will work on the special strategy in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.