नवी दिल्ली:वाराणसीतीलज्ञानवापी मशीद संकुलात सापडलेल्या शिवलिंगाच्या सुरक्षेप्रकरणी हिंदू पक्षाला शुक्रवारी मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवलिंगाचे संरक्षण पुढील आदेशापर्यंत वाढवले आहे. यासोबतच समितीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षांना उत्तर दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढताना ते जिल्हा न्यायाधीशांसमोर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
ज्ञानवापी खटल्यातील हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी माहिती दिली की, सर्वोच्च न्यायालयने सर्वेक्षण आयुक्ताच्या नियुक्तीबाबत उच्च न्यायालयच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या ज्ञानवापी मशीद समितीच्या याचिकेवर हिंदू पक्षाला तीन आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले आहे. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गुरुवारी हिंदू बाजूचे वकील विष्णू शंकर जैन यांच्या निवेदनाची दखल घेतली होती. तसेच, या प्रकरणात दिलेल्या संरक्षणाचे आदेश 12 नोव्हेंबरला संपत असून, यात मुदतवाढ महत्वाची असल्याचे सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने 17 मे रोजी अंतरिम आदेश देत वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकार्यांना ज्ञानवापी-श्रृंगार गौरी संकुलाच्या आतील भागाची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले होते. त्याचवेळी, सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिमांना ज्ञानवापी मशिदीत नमाज अदा करण्याची परवानगीही दिली होती. वाराणसीतील फास कोर्टाने मंगळवारी 'शिवलिंग' पूजेला परवानगी देणार्या वेगळ्या याचिकेवर सुनावणी करताना 14 नोव्हेंबरपर्यंत आपला निर्णय पुढे ढकलला आहे.