नवी दिल्ली : गेल्या महिन्यात काही वस्तूंवरील जीएसटी कमी केल्यानंतर आता आजच्या बैठकीत उद्योजकांच्या फायद्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. ज्या कंपन्यांची वार्षिक उलाढाल 40 लाख असेल त्यांना जीएसटीमधून सूट जाहीर करण्यात आली आहे. याआधी ही सूट 20 लाख उलाढाल असलेल्या कंपन्यांना होती.
तसेच कम्पोझिशन स्कीमअंतर्गत येणाऱ्या कंपन्यांसाठी मर्यादाही शिथिल करण्यात आली असून 1.5 कोटी रुपये झाली आहे. या स्कीममध्ये येणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक तिमाहीमध्ये कर भरावा लागणार आहे, मात्र, कर परतावा वर्षातून एकदाच भरावा लागणार आहे, असेही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. गुरुवारी दुपारी जीएसटी काऊन्सिलची बैठक आयोजित केली होती. यानंतर जेटली यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
याचबरोबर सेवा पुरवठादार कंपन्यांनाही कम्पोझिशन स्कीममध्ये घेण्यास आजच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.