Kolkata Doctor Murder Case: कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या हत्या प्रकरणाचा सीबीआयने तपास सुरू केला आहे. या प्रकरणात आता मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे, सीबीआयला आता आरोपी संजय रॉय याची नार्को टेस्ट करण्यासाठी न्यायालयाने सीबीआयला मंजुरी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने या संदर्भात आवश्यक परवानगीसाठी सियालदह न्यायालयात अर्ज केला होता.
नेत्याचा महिलेसोबत संशयास्पद अवस्थेत व्हिडीओ व्हायरल; भाजपने कारवाई केली
या चाचणीद्वारे सीबीआयला महत्वाची माहिती मिळणार आहे. आरोपीने नार्को आणि पॉलीग्राफमध्ये चाचणीतील एकच आहे का? हे सीबीआय पाहणार आहे. या घटनेत संजय रॉयचा सहभाग असल्याची खात्री अधिकाऱ्यांना करायची आहे.
नार्को चाचणीमध्ये आरोपीला काही औषधे दिली जातात, त्यानंतर ती व्यक्ती अर्धवट बेशुद्ध अवस्थेत जातो. यानंतर, व्यक्तीकडून छुपी माहिती काढण्याचा प्रयत्न केला जातो. एखादा आरोपी ज्यावेळी पोलिसांना चौकशीत सहकार्य करत नाही त्यावेळी ही चाचणी केली जाते. गुंतागुंतीची प्रकरणे सोडवण्यासाठी आणि महत्त्वाचे पुरावे शोधण्यासाठी नार्कोॲनालिसिस चाचणी केली जाते.
पोलिसांनी जबरदस्तीने शूट केला Video
कोलकाता मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरण गुंतागुंतीचे होत आहे. या प्रकरणी आतापर्यंत संजय राय याला अटक करण्यात आली आहे. याच दरम्यान पीडितेच्या आई-वडिलांचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामुळे खळबळ उडाली आहे.
आरजी कर रुग्णालयातील आंदोलक डॉक्टरांसोबत सहभागी झालेल्या मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांनी कोलकाता पोलिसांनी मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. महिला डॉक्टरच्या वडिलांनी सांगितलं की, आम्हाला आमच्या मुलीचा मृतदेह ठेवायचा होता, पण आमच्यावर खूप दबाव टाकण्यात आला आणि तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला बाजूला घेऊन पैसे देऊ केल्याचा आरोपही पीडितेच्या वडिलांनी केला आहे. त्यांच्या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनानंतर आणि अंत्यसंस्काराआधी घरी आणण्यात आला. मात्र मुलीच्या वडिलांनी पैसे घेण्यास नकार देत आपलं मत मांडलं.