नवी दिल्ली: कोळशाच्या कमतरतेमुळे भारतावर मोठं वीज संकट कोसळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर रेल्वे विभागाने एक मोठं पाऊल उचललं आहे. थर्मल पॉवर प्लांटला कोळशाची कमतरता भासू नये यासाठी रेल्वे विभागाने 24 तास कोळसा वाहणाऱ्या माल गाड्या चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी दररोज लोड होणाऱ्या कोळशाची संख्या 430 वरुन 440-450 पर्यंत पोहोचली आहे. सोमवारी 1.77 दशलक्ष टन कोळसा ट्रांसफर करण्यात आला. एका दिवसात सुमारे 500 रेकपर्यंत मागणी पोहोचली असली तरी ट्रांसपोर्टर या कोळशाचा आरामात पुरवठा करतील. ऊर्जा आणि कोळसा मंत्रालयाशी झालेल्या चर्चेनंतर रेल्वेने आश्वासन दिले आहे की कोळसा वाहून नेण्याची क्षमता राष्ट्रीय वाहतूकदारांना अडथळा होणार नाही आणि ते वीज केंद्रांवर आवश्यक तितका कोळसा वाहतूक करण्यास तयार आहेत.
मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, एक किंवा दोन दिवसात परिस्थिती सामान्य होणार नाही. त्यामुळे कोळसा वाहतुकीची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. लोडिंग-अनलोडिंग तसेच रिक्त रेकच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. नोव्हेंबरमध्ये वीजेची मागणी थोडी कमी होते, त्यामुळे लवकरच या संकटातून बाहेर काढले जाईल.