उत्तर सिक्कीममध्ये लोनाक तलावावर अचानक ढगफुटी झाल्याने लाचेन खोऱ्यातील तिस्ता नदीला मोठा पूर आला आहे. यामध्ये तिथे तैनात असलेले २३ जवान बेपत्ता झाले होते. यापैकी एक जवान जखमी अवस्थेत सापडला आहे. त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने खालच्या प्रवाहातील पाण्याची पातळी अचानक १५-२० फुटांपर्यंत वाढली. त्यामुळे सिंगतामजवळील बारडांग येथे उभ्या असलेल्या लष्कराच्या वाहनांचे हाल झाले आहेत.
भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, वाचविण्यात आलेल्या जवानाची प्रकृती स्थिर असून त्याला वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे, असेही त्यात म्हटले आहे.
डिफेन्स पीआरओच्या म्हणण्यानुसार, चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने डाउनस्ट्रीममधील पाण्याची पातळी अचानक १५-२० फुटांपर्यंत वाढली. त्यामुळे सिंगतामजवळील बारडांग येथे उभ्या असलेल्या लष्कराच्या वाहनांची कोंडी झाली.