नोटाबंदी हा आजवरचा सर्वात मोठा घोटाळा, काँग्रेसचा घणाघाती आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 05:55 AM2018-11-10T05:55:44+5:302018-11-10T05:56:00+5:30

दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला तेव्हा त्याला काँग्रेसह सर्व विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला होता.

The biggest scam, the Congress is the scandal | नोटाबंदी हा आजवरचा सर्वात मोठा घोटाळा, काँग्रेसचा घणाघाती आरोप

नोटाबंदी हा आजवरचा सर्वात मोठा घोटाळा, काँग्रेसचा घणाघाती आरोप

googlenewsNext

- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला तेव्हा त्याला काँग्रेसह सर्व विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला होता. आता या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. नोटाबंदी हा स्वतंत्र भारतातील आजवरचा सर्वात मोठा घोटाळा आहे अशा आरोप करत काँग्रेस पक्षाने जोरदार निदर्शने केली. उत्तर प्रदेशात सपा, बसपानेही नोटाबंदीवरूनच मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मायावती यांनी म्हटले आहे की, नोटाबंदीचा निर्णय घेताना मोदी सरकारने जनतेला दाखविलेल्या स्वप्नांपैकी एकही पूर्ण झालेले नाही. सपाचे नेते अखिलेश यादव यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदींनी जनतेच्या सवालांना उत्तर देण्यासाठी ५० दिवस मागितले होते. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी झाली. त्यानंतर दोन वर्षे उलटली तरी मोदी या निर्णयाच्या परिणामांबद्दल तोंड उघडायला तयार नाहीत. या निर्णयामुळे देशातील बेकारी वाढली. त्यामुळे अर्थव्यवस्थाही अडचणीत आली आहे.
काँग्रेसने नोटाबंदीविरोधात रिझर्व्ह बँकेच्या दिल्लीतील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. त्यात सहभागी झालेले अशोक गेहलोत, आनंद शर्मा, मुकुल वासनिक, भूपेंद्रसिंह हुड्डा, सुष्मिता देव केशव यादव, मनीष चतरथ यांसह काही काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून संसद मार्ग ठाण्यात घेऊन गेले व काही वेळाने सुटका केली. गेहलोत यांनी निदर्शकांसमोर केलेल्या भाषणात सांगितले की, नोटाबंदी हा अर्थव्यवस्थेवर केलेला आत्मघाती हल्ला होता. दिल्ली, लखनौ, जयपूरसह संपूर्ण देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी नोटाबंदीविरोधात निदर्शने केली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगढमध्ये आरोप केला की, नरेंद्र मोदी यांनी आपल्या सुटबुटवाल्या उद्योगपती मित्रांच्या मदतीसाठी नोटांबंदी केली. उद्योगपतींना आपला काळा पैसा पांढरा करता यावा यासाठी हा निर्णय घेतला.

सुरजेवालांनी उजेडात
आणले भाजपाचे कूकर्म

ंस्वतंत्र भारतातील नोटाबंदी हा आजवरचा सर्वात मोठा घोटाळा आहे असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आरोप केला. या निर्णयाबाबत सात प्रश्न उपस्थित करून त्याची उत्तरे भाजपाने द्यावीत अशी मागणी त्यांनी केली होती. गुजरातमधील ज्या सहकारी बँका भाजपच्या ताब्यात आहेत त्यांना हाताशी धरून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न अमित शहा यांनी केल्याचा आरोप सुरजेवालांनी केला होता. सहकारी बँकांची आरटीआयद्वारे मिळालेली कागदपत्रे त्यांनी आपल्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ प्रसारमाध्यमांसमोर ठेवली होती. देशभरात भाजपसाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनींच्या व्यवहारांबाबतची कागदपत्रेही त्यांनी उजेडात आणली होती. या गैरव्यवहारांची मोदींनी चौकशी करावी अशी मागणीही सुरजेवालांनी केली होती.

Web Title: The biggest scam, the Congress is the scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.