विकास झाडेनवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने देशभर हाहाकार उडाला आहे. ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांनी वेग घेतला असतानाच देशातील महत्त्वाच्या जवळपास ४० नेत्यांना कोरोनाने ग्रासले आहे. गेल्या १० दिवसांमध्ये देशातील ४० मोठे नेते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये ३ राज्यांचे मुख्यमंत्री, दोन राज्यांचे तीन उपमुख्यमंत्री आणि सहा केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.
- अरविंद केजरीवाल (दिल्ली),
- नितीश कुमार (बिहार),
- बसवराज बोम्मई (कर्नाटक),
- रेणू देवी (उपमुख्यमंत्री, बिहार),
- तारकिशोर प्रसाद (उपमुख्यमंत्री, बिहार),
- मनोहर आजगावकर (उपमुख्यमंत्री, गोवा)
- दुष्यंत चौटाला (उपमुख्यमंत्री, हरियाणा)
केंद्रीय मंत्री संक्रमणात
- नितीन गडकरी (केंद्रीय रस्ते परिवहन, महामार्ग),
- राजनाथ सिंह (संरक्षण),
- ज्योतिरादित्य शिंदे (विमान वाहतूक),
- अजय भट्ट (संरक्षण राज्यमंत्री),
- महेंद्र नाथ पाण्डेय (अवजड उद्योग),
- भारती पवार (आरोग्य राज्य मंत्री),
- अश्विनी चौबे (सार्वजनिक वितरण राज्य मंत्री).
महाराष्ट्रातील मंत्री आणि खासदार
सुप्रिया सुळे एनसीपी, अरविंद सांवत, शिवसेना, राजन विचारे, शिवसेना, एकनाथ शिंदे, नगर विकासमंत्री, बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री, वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री, यशोमती ठाकुर, महिला बाल कल्याणमंत्री.
बिहारचे मंत्री आणि नेतेराजीव रंजन उर्फ लल्लन सिंह, राष्ट्रीय अध्यक्ष, जेडीयू, जीतनराम मांझी, पूर्व मुख्यमंत्री, अशोक चौधरी, कॅबिनेट मंत्री, सुनील कुमार, कॅबिनेट मंत्री.
पश्चिम बंगालचे नेतेडेरेक ओ ब्रायन, टीएमसी नेता, बाबुल सुप्रियो, पूर्व केंद्रीय मंत्री व टीएमसी नेते, कुणाल घोष, टीएमसी प्रवक्ता.
संक्रमित मंत्री : गोविंद सिंह राजपूत (परिवहन, मध्य प्रदेश), टी. एस. देव सिंह, (आरोग्य, छत्तीसगड), राणा गुरजित सिंह (पंजाब). समाजवादी पार्टीच्या डिंपल यादव.