ऑनलाइन लोकमत
पटना, दि. २८ - बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यासाठी आज एकूण ५३.३२ टक्के मतदान झाले. या तिस-या टप्प्यात ५० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण ८०८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य यंत्रबंद झाले.
सारण, वैशाली, नालंदा, पटना, भोजपुर आणि बक्सर या सहा जिल्ह्यातील ५० मतदारसंघात मतदान झाले. यामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या दोन पुत्रांसह एकूण ८०८ उमेदवारांचे भवितव्य यंत्रबंद झाले.
तिस-या टप्प्यातील ५० जागांसाठी एकूण ५३.३२ टक्के मतदान झाले. यामध्ये सारण (५२ टक्के), वैशाली (५४ टक्के), नालंदा (५४ टक्के), पटना (५१ टक्के), भोजपुर (५३ टक्के) आणि बक्सरमध्ये ५६ टक्के मतदान झाल्याचे निवडणुक अधिका-यांनी सांगितले.