Bihar Assembly Election 2020 : काँग्रेसच्या मुख्यालयावर इन्कम टॅक्स विभागाची धाड, सुरजेवाला यांचीसुद्धा चौकशी

By बाळकृष्ण परब | Published: October 22, 2020 09:31 PM2020-10-22T21:31:19+5:302020-10-22T21:34:29+5:30

Income tax raid on Congress headquarters News : प्राप्तिकर विभागाच्या पथकाने बिहारची राजधानी पाटणामधील काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या सदाकत आश्रवावर धाड टाकली.

Bihar Assembly Election 2020: Income tax raid on Congress headquarters, Surjewala also questioned | Bihar Assembly Election 2020 : काँग्रेसच्या मुख्यालयावर इन्कम टॅक्स विभागाची धाड, सुरजेवाला यांचीसुद्धा चौकशी

Bihar Assembly Election 2020 : काँग्रेसच्या मुख्यालयावर इन्कम टॅक्स विभागाची धाड, सुरजेवाला यांचीसुद्धा चौकशी

googlenewsNext
ठळक मुद्देप्राप्तिकर विभागाच्या या छाप्याची कारवाई सुमारे एक तास चाललीप्राप्तिकर विभागाने एका कारमधून आठ लाख रुपये जप्त केलेया प्रकरणी काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला आणि बिहारचे प्रभारी शक्तिसिंह गोहिल यांचीही चौकशी करण्यात आली

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराने जोर धरला आहे. दरम्यान, आज प्राप्तिकर विभागाच्या पथकाने बिहारची राजधानी पाटणामधील काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या सदाकत आश्रवावर धाड टाकली आहे. या धाडीदरम्यान, प्राप्तिकर विभागाने एका कारमधून आठ लाख रुपये जप्त केले. तसेच या प्रकरणी काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला आणि बिहारचे प्रभारी शक्तिसिंह गोहिल यांचीही चौकशी करण्यात आली.

प्राप्तिकर विभागाने काँग्रेसच्या कार्यालयावर नोटिस लावली आहे. दरम्यान शक्ती सिंह गोहिल यांनी जप्त केलेली रक्कम कुणाची आहे, हे मला माहिती नाबी असे सांगितले. प्राप्तिकर विभागाच्या या छाप्याची कारवाई सुमारे एक तास चालली. या प्रकरणी प्राप्तिकर विभागाने एका व्यक्तीला पकडले आहे. त्याने ही रक्कम पाटणामधील कुणाला तरी देण्यात येणार होता, असे सांगितले. आता प्राप्तिकर विभाहाने काँग्रेसकडे संपूर्ण प्रकरणाचे उत्तर मागितले आहे. ही रक्कम कुठून आली आणि कुठल्या नेत्याने या व्यक्तीला ही रक्कम दिली होती, अशी विचारणा प्राप्तिकर विभागाने केली आहे.



दरम्यान, या कारवाईवरून शक्तिसिंह गोहिल यांनी प्राप्तिकर विभागावर जोरदार टीका केली आहे. परिसरात बाहेर एका गाडीतून पैसे जप्त करण्यात आल्यानंतर प्राप्तिकर विभागाने नोटिस दिली आहे. ही रक्कम कार्यालयाच्या परिसरातून रक्कम जप्त करण्यात आलेली नाही.आम्ही सहकार्य करू. रक्सौलमध्ये भाजपाच्या उमेदवाराकडून २२ किलो सोने आणि २.५ किलो चांदी जप्त करण्यात आली होतो. प्राप्तिकर विभाग तिथे का जात नाही आहे, अशी विचारणाही त्यांनी केली.

तर सत्ता येण्यापूर्वीच महाआघाडीच्या नेत्यांना लुटमार सुरू केली आहे. प्राप्तिकर विभागाने महाआघाडीच्या नेत्यांच्या घरांवार धाडी टाकाव्यात, तिथे अब्जावधी रुपये मिळतील, असा आरोप बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी केला आहे.

 

Web Title: Bihar Assembly Election 2020: Income tax raid on Congress headquarters, Surjewala also questioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.