पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराने जोर धरला आहे. दरम्यान, आज प्राप्तिकर विभागाच्या पथकाने बिहारची राजधानी पाटणामधील काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या सदाकत आश्रवावर धाड टाकली आहे. या धाडीदरम्यान, प्राप्तिकर विभागाने एका कारमधून आठ लाख रुपये जप्त केले. तसेच या प्रकरणी काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला आणि बिहारचे प्रभारी शक्तिसिंह गोहिल यांचीही चौकशी करण्यात आली.प्राप्तिकर विभागाने काँग्रेसच्या कार्यालयावर नोटिस लावली आहे. दरम्यान शक्ती सिंह गोहिल यांनी जप्त केलेली रक्कम कुणाची आहे, हे मला माहिती नाबी असे सांगितले. प्राप्तिकर विभागाच्या या छाप्याची कारवाई सुमारे एक तास चालली. या प्रकरणी प्राप्तिकर विभागाने एका व्यक्तीला पकडले आहे. त्याने ही रक्कम पाटणामधील कुणाला तरी देण्यात येणार होता, असे सांगितले. आता प्राप्तिकर विभाहाने काँग्रेसकडे संपूर्ण प्रकरणाचे उत्तर मागितले आहे. ही रक्कम कुठून आली आणि कुठल्या नेत्याने या व्यक्तीला ही रक्कम दिली होती, अशी विचारणा प्राप्तिकर विभागाने केली आहे.