पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या महाआघाडीने शनिवारी जागा वाटप जाहीर केले. सर्व पक्षांनी तेजस्वी यादव यांना आघाडीचे नेते म्हणून समर्थन दिले. या आघाडीत २४३ सदस्यीय विधानसभेत राजद १४४, काँग्रेस ७० जागा लढविणार आहे. माकपा ६, भाकपा ४ आणि भाकपा (माले) यांना १९ जागा देण्यात आल्या आहेत.या जागावाटपाची घोषणा झाल्यानंतर काही वेळातच व्हीआयपी पार्टीचे नेते मुकेश सहनी यांनी आपल्या पक्षाला जागा न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि महाआघाडीतून वेगळे होत असल्याची घोषणा केली. राजदने आम्हाला धोका दिला, असा आरोपही त्यांनी केला.तेजस्वी यादव म्हणाले की, जनादेशाचा अपमान करणाऱ्यांना लोक धडा शिकवतील. दहा लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. आघाडीत झालेल्या चर्चेनुसार वाल्मिकीनगर लोकसभा जागेसाठी होणाºया पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार उभा करणार आहे. २०१५ मध्ये राजद, काँग्रेस आणि जदयू यांनी एकत्र निवडणूक लढविली होती. मात्र, नंतर नितीशकुमार यांनी भाजपसोबत युती केली.लालूप्रसाद महाआघाडीचे बॉसलालूप्रसाद यादव यांनी काँग्रेसची मागणी मान्य केली आणि त्यांना ७० जागा दिल्या. अर्थात, काँग्रेसला यासाठी लालूप्रसाद यांची अट मान्य करावी लागल्याचे सांगितले जाते. ती म्हणजे तेजस्वी यांचे नेतृत्व मान्य करावे लागेल. त्यामुळे लालूप्रसाद हेच आघाडीचे बॉस असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
Bihar Assembly Election 2020: राजद १४४, काँग्रेस लढणार ७० जागा; तेजस्वी यादव महाआघाडीचं नेतृत्त्व करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2020 2:56 AM