नवी दिल्ली : बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागांसाठी मतदानाची प्रक्रिया आज पूर्ण झाली. तिसऱ्या टप्प्यातील ७८ जागांसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर मतदानाेत्तर जनमत चाचण्यांचे अंदाज (एक्झिट पाेल) समाेर आले आहेत.
नीतीशकुमार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लाेकतांत्रिक आघाडी आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील महाआघाडीमध्ये लढत हाेती. मात्र, काेणलाही स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज बहुतांश सर्वच चाचण्यांमध्ये वर्तविण्यात आला आहे. केवळ टुडेज चाणक्यने महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
सर्व चाचण्यांचे अंदाज पाहता महाआघाडीला सरकार स्थापनेची संधी मिळेल आणि तेजस्वी यादव मुख्यमंत्री होतील, अशी शक्यता दिसते. आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील महाआघाडीला १२० ते १२४ म्हणजेच बहुमताच्या जागा मिळण्याचा अंदाज बहुतांश चाचण्यांमध्ये वर्तविण्यात आला आहे.
एक्झिट पाेल एनडीए महाआघाडी एलजेपी इतरएबीपी-सी व्हाेटर १०४-१२८ १०८-१३१ ०१-०३ ०४-०८टीव्ही९ भारतवर्ष ११५ १२० ०१ ०६टाईम्स नाऊ-सी व्हाेटर ११६ १२० ०१ ०६रिपिब्लक-जन की बात ९१-११७ ११८-१३८ ०५-०८ ०३-०६इंडिया टीव्ही ११२ ११० - -टुडेज चाणक्य ४४-५६ १६९-१९१ - -पाेल ऑफ पाेल्स ११० १२४ ०४ ०५
गेल्या निवडणुकीत एक्झिट पाेल्सचे अंदाज चुकले
मागील विधानसभा निवडणुकीत जवळपास सर्वच एक्झिट पाेल्सचे अंदाज चुकले हाेते. टुडेज चाणक्यने एनडीएला १४४ ते १६६ जागा देऊ केल्या हाेत्या. एनडीटीव्हीनेही बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन हाेणार असल्याचा अंदाज वर्तविला हाेता. एबीपी-नेस्लनच्या एक्झिट पाेलमध्ये एनडीएचा माेठा विजय हाेणार असल्याचा अंदाज वर्तविला हाेता. केवळ ॲक्सिस-एपीएमने वेगळा अंदाज व्यक्त केला हाेता.
बेराजगारी, आराेग्य, शिक्षणाच्या मुद्द्यांवर भर
प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व नीतीशकुमार यांनी ‘जंगलराज’ मुद्दा उचलून धरला. त्यांनी १५ वर्षांपूर्वीचे लालुंचे राज्य कसे हाेते, याची आठवण करुन दिली. तेजस्वी यांनी बेराजगारी, आराेग्य आणि शिक्षणाच्या मुद्द्यांवर प्रचारात भर दिला. हे मुद्दे बिहारी जनतेला भावल्याचे एक्झिट पाेलमध्ये दिसून येत आहे.
मतदान करतांना मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांकांनी महाआघाडीला मतदान केले. तर उच्च जातींच्या मतदारांनी एनडीएला मते दिली. पंतप्रधान माेदींसह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी एनडीएसाठी प्रचार केला. तर काॅंग्रेसचे नेते राहुल गांधीही महाआघाडीसाठी प्रचारात उतरले हाेते.
मध्य प्रदेशात भाजपला १६ ते १८ जागांचा अंदाज
बिहारनंतर देशाचे लक्ष लागले आहे ते मध्य प्रदेशातील पोट निवडणुकीकडे. मध्य प्रदेशात २८ जागांसाठी पाेटनिवडणूक झाली. त्यापैकी १६ ते १८ जागा भाजपला मिळतील, असा अंदाज इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडिया एक्झिट पाेलमध्ये वर्तविण्यात आला. शिवराजसिंह चाैहान यांचे सरकार स्थिर राहिल असे संकेत या पाेलने दिले आहेत. तर काॅंग्रेसला १० ते १२ जागा मिळू शकतात. भाजपचे नेते ज्याेतिरादित्य शिंदे यांच्यासाठीही ही निवडणूक महत्वाची आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्येही भाजपला ५ किंवा ६ जागा मिळू शकतात. तर, गुजरातच्या पोट निवडणुकीत भाजपला ६ किंवा ७ जागा मिळण्याची शक्यता या चाचणीत वर्तविली आहे.