- असीफ कुरणे कोल्हापूर : बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत यावेळी जातीधर्माच्या मुद्द्यांप्रमाणेच बेरोजगारी कळीचा मुद्दा बनण्याची चिन्हे आहेत. कोरोनाचे लॉकडाऊन, देशाची विसकटलेली आर्थिक घडी, यामुळे लाखो बिहारी युवक सध्या राज्यात परतले आहेत. इतर वेळी फक्त निवडणूक व सणासुदीला येणारे हे युवक यावेळी घरात बसून आहेत. त्यांच्यातील संतापाचा फटका नेमका कोणाला व किती बसणार यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे.गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या नितीशकुमार यांनी राज्यात रोजगारवाढीसाठी कोणतेही ठोस काम केलेले नाही. त्यामुळे राज्यात बेरोजगारीचा दर ४६ टक्क्यांवर गेलेला असून, देशात तो सर्वाधिक आहे. असा आरोप करीत राजद, काँग्रेसने या तरुण मतदारांना आकर्षित करण्यावर भर दिलेला आहे. तेजस्वी यादव यांनी बेरोजगारी हटाव यात्रेची हाक देऊन निवडणुकीत आपला भर कशावर असेल हे दाखवून दिले होते. राज्यात ४ लाख ५० हजार सरकारी जागा रिक्त आहेत. बेरोजगारांसाठी सुरू केलेल्या संकेतस्थळावर ५ लाख अर्ज आले असून, जवळपास १० लाख बेरोजगारांनी मिस कॉल देऊन आपली नोंदणी केली असल्याचे राजदचे संजय यादव यांनी माध्यमांना सांगितले. नितीश कुमार हेदेखील युवा शक्ती बिहार की प्रगती, कौशलविकासच्या माध्यमातून युवकांना रोजगाराचे आश्वासन देत आहेत.१० लाख नोकऱ्या देणारमहागठबंधनचे सरकार आल्यास मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत राज्य सरकारच्या रिक्त असलेल्या जागा भरत १० लाख युवकांना नोकरी देण्यात येईल, असे आश्वासन राष्ट्रीय जनता दलाचे नेते व महागठबंधनचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी दिले आहे.जामीन मिळूनही लालूप्रसाद तुुरुंगातचरांची (झारखंड) : चारा घोटाळ्यातील चैबसा कोषागाराशी संबंधित खटल्यात राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. यादव यांना या खटल्यात सुनावल्या गेलेल्या पाच वर्षे तुरुंगवासापैकी निम्मी शिक्षा त्यांंनी भोगली असल्यामुळे हा जामीन मंजूर झाला. हा जामीन मंजूर झाला तरी यादव दुमका कोषागाराशी संबंधित प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा भोगत असल्यामुळे तुरुंगातच राहतील. या कोषागारात त्यांनी सुमारे ३.१३ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.
Bihar Assembly Election 2020: ‘बेरोजगार बिहारी’ नितीशकुमारांची दुखती नस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 2:33 AM