Bihar Assembly Election Result : महाआघाडी पिछाडीवर पडताच काँग्रेसने घेतली ईव्हीएमवर शंका, दिला असा तर्क
By बाळकृष्ण परब | Published: November 10, 2020 01:05 PM2020-11-10T13:05:58+5:302020-11-10T13:07:06+5:30
Bihar Assembly Election Result News : बिहारमधील आतापर्यंतच्या कलांमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने १३० जागांवर आघाडी घेतली आहे. तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने १०० ते १०५ जागांवर आघाडी घेतली आहे.
नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होऊन आता साडे-चार ते पाच तास झाले आहेत. या कलांमध्ये आतापर्यंतच्या कलांमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने १३० जागांवर आघाडी घेतली आहे. तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने १०० ते १०५ जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, बिहारमधील मतमोजणीत महाआघाडी पिछाडीवर पडताच काँग्रेसने ईव्हीएमवर शंका घेतली आहे. काँग्रेसचे नेते उदित राज यांनी महाआघाडी पिछाडीवर पडताच ईव्हीएमच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ईव्हीएम हॅक का होऊ शकत नाही, असा आरोप उदित राज यांनी केला आहे.
महाविकास आघाडी पिछाडीवर पडत असल्याचा कल समोर आल्यानंतर काँग्रेस नेते उदित राज यांनी ट्विट करत ईव्हीएमवर शंका घेतली ते म्हणाले. जर मंगळ ग्रह आणि चंद्रावर जाणाऱ्या उपग्रहाची दिशा पृथ्वीवरून नियंत्रित करता येत असेल तर ईव्हीएम हॅक का करता येणार नाही? अमेरिकेत जर ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान झालं असतं तर ट्रम्प पराभूत झाले असते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
'When the direction of the devices going towards Mars and moon can be controlled from the Earth then why can't the EVMs be hacked?', tweets Congress leader Udit Raj. pic.twitter.com/38VVATC8rr
— ANI (@ANI) November 10, 2020
बिहारमधील मतमोजणीच्या सध्याच्या कलांमध्ये एनडीए १३० जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडी ही १०० ते १०५ जागांवर आघाडीवर आहे. पक्षवार विचार केल्यास निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपा ७२, जनता दल युनायटेड ४८, राष्ट्रीय जनता दल ६५, काँग्रेस २१ आणि लोकजनशक्ती पार्टी २ जागांवर आघाडीवर आहे. तर डावे पक्ष १९ जागांवर आघाडीवर आहे.