पाटणा : बिहार विधानसभा निवडणूक (Bihar Assembly Elections 2020) निकालाची मतमोजणी सुरू झाली आहे. तमाम मतदानोत्तर जनमत चाचण्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे युवा नेते तेजस्वी यादव (RJD Leader Tejashwi Yadav) यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला दिलेले झुकते माप आणि तरुणांमध्ये तेजस्वी यांच्याविषयी असलेले आकर्षण या पार्श्वभूमीवर बिहारच्या मुख्यमंत्रिपदी तेजस्वी यांना पसंती दिली जाते की, मतदार नितीशकुमार (JDU Leader Nitish Kumar) यांना चौथ्यांदा संधी देतात, याचा फैसला आज होणार आहे. बिहारमधील या निकालांबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतमोजणीची प्रक्रिया सकाळी 8 वाजता सुरू झाली आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये (Bihar Assembly Election 2020 Exit Poll ) तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला कौल देण्यात आला आहे. त्यामुळे मतमोजणीत कोण बाजी मारतं हे पाहण्याचे ठरणार आहे. या महाआघाडीत राष्ट्रीय जनता दल (RJD), काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश आहे. तर दुसरीकडे नितीशकुमारांनाही बिहारमध्ये पुन्हा त्यांचंच सरकार येईल, अशी आशा आहे. दरम्यान, मतमोजणीसाठी स्ट्राँग रुमपासून मतमोजणी केंद्रांपर्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
- LIVE UPDATES
- मतमोजणीत घोटाळा झाल्याचा संशय; महागठबंधनच्या नेत्यांची निवडणूक आयोगाकडे धाव- एनडीए १२०, तर महागठबंधन ११५ जागांवर आघाडीवर; अद्याप बहुमत नसल्यानं भाजपच्या मुख्यालयातील सेलिब्रेशन थांबवलं
- स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणाऱ्या चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष सध्या एकाही मतदारसंघात आघाडीवर नाही
- पहिल्या क्रमांकासाठी राजद आणि भाजपमध्ये जोरदार लढत; राजद ७३, तर भाजप ७२ जागांवर पुढे
- दोन तासांत आकडे बदलतील. राजदचं सरकार येईल; राजद नेते श्याम रजक यांनी तेजस्वी यादवांच्या भेटीनंतर व्यक्त केला विश्वास- निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार, आता सध्या २४३ पैकी ४३ जागा अशा आहेत, जिथं दोन उमेदवारांच्या मतांमध्ये केवळ १ हजार मतांचं किंवा त्यापेक्षा कमी अंतर आहे. ८० टक्के मतांची मोजणी अजून व्हायची आहे.
एनडीए आघाडीवर, भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष
- पहिला निकाल भाजपाच्या बाजूने, दरभंगामधील केवटी मतदारसंघातून भाजपा उमेदवार मुरारी मोहन झा विजयी
- आतापर्यंत ९२ लाख मतांची मोजणी
बिहार निवडणुकीत सुमारे ४.१० कोटी मतं पडली आहेत. त्यापैकी आतापर्यंत ९२ लाख मते मोजली गेली आहेत. पूर्वी मतमोजणीच्या २५-२६ फेऱ्यांचा वापर होता, यावेळी या फेऱ्यांची संख्या ३५ वर गेली आहे. त्यामुळे मतमोजणी रात्री उशीरापर्यंत सुरू राहू शकते, असे बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) एचआर श्रीनिवास यांनी सांगितले आहे.
- राघोपूर मतदारसंघातून तेजस्वी यादव आघाडीवर
बिहारमध्ये एनडीएची मुसंडी, सध्याच्या कलानुसार एनडीए १२७ तर, महाआघाडी १०० जागांवर आघाडीवर
एनडीएने आघाडी घेतल्यानंतर भाजपा समर्थकांनी घोषणाबाजी केली...
- एनडीएला १५० हून अधिक जागा मिळणार - जेडीयू
- हसनपूर विधानसभा मतदारसंघातून तेज प्रताप यादव आघाडीवर
पाटना- तेजस्वी यादव यांचे समर्थक त्यांच्या घरासमोर फोटो आणि मासे घेऊन उभे आहेत.
- हसनपूर विधानसभा मतदारसंघातून तेजस्वी यादव यांचे मोठे बंधू तेज प्रताप पिछाडीवर, तर इमामगंजमधून माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी देखील पिछाडीवर
- बिहार निवडणुकीच्या कलांमध्ये बदल, एनडीएची मुसंडी, 119 जागांवर आघाडी तर महाआघाडी 116 जागांवर पुढे
- तेजस्वी यादव राघोपूरमध्ये आघाडीवर; एनडीए 111 महाआघाडी 126 जागांवर आघाडीवर
-निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, १७ जागांवर एनडीए आणि १० जागांवर महाआघाडी आघाडीवर
- तेजस्वी यादव यांचे बंधू तेजप्रताप यादव यांनी 'तेजस्वी भवः बिहार!' असे ट्विट केले आहे...
- पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीत महाआघाडीने घेतली आघाडी
- मतमोजणीला सुरुवात, पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरु
पाटना - मतमोजणीसाठी अनुग्रह नारायण कॉलेजमधील स्ट्राँग रुम उघडण्यात आली...