शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

Bihar Assembly Election Results : बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष, NDA बहुमताच्या पुढे

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 10, 2020 11:51 AM

कोरोना काळातील ही देशातील पहिलीच निवडणूक आहे. हिंदी बेल्टमधील निवडणुकीच्या दृष्टीने, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर बिहारमधील निवडणूक तिसऱ्या क्रमांकाची सर्वात महत्वाची निवडणूक मानली जाते.

ठळक मुद्देआतापर्यंत आलेल्या निकालांत एनडीएला बहुमत मिळताना दिसत आहे.भाजपा बिहारमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसत आहे.कोरोना काळातील ही देशातील पहिलीच निवडणूक आहे.

पाटणा - बिहार निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. राज्याची सत्ता कुणाच्या हाती द्यायची हे जनतेने मतदान करून मतदान यंत्रांमध्ये बंद केले आहे. आता थोड्याच वेळात बिहारचे चित्र अगदी स्पष्ट होईल. मात्र, आतापर्यंत आलेल्या निकालांत एनडीएला बहुमत मिळताना दिसत आहे. तर भाजपा बिहारमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसत आहे. कोरोना काळातील ही देशातील पहिलीच निवडणूक आहे. हिंदी बेल्टमधील निवडणुकीच्या दृष्टीने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर बिहारमधील निवडणूक तिसऱ्या क्रमांकाची सर्वात महत्वाची निवडणूक मानली जाते. यामुळेच हिम्मत करून लोक घरातून बाहेर पडले, सभा झाल्या आणि मतदानही झाले. मात्र, आता वेळ आहे मतमोजणीची आणि बिहारच्या मनात नेमके कोण? हे पाहण्याची. 

Bihar Assembly Election Results : पंतप्रधान मोदींविरोधात उद्धटपणे बोलू नका, तेजस्वी यादव यांचा RJD नेत्यांना इशारा

यावेळी बिहारमध्ये महागठबंधनविरुद्ध एनडीए, अशी काट्याची टक्कर बघायला मिळाली. मात्र, आजचे निकाल म्हणजे गत 15 वर्षांच्या नितिश सरकारसंदर्भातील जनतेचा निर्णय असेल. महत्वाचे म्हणजे, बिहारमध्ये एका मावळत्या पिढीला नव्या आणि उगवत्या पिढीने थेट टक्कर दिली आहे. यात जनतेने नव्या आणि जुन्यात आपले पुढील भविष्य निवडले आहे.

या निवडणुकीत 31 वर्षीय तेजस्वी यादव यांनी नीतीश कुमारांबरोबर थेट टक्कर घेतली आहे.  एनडीएला 150 हून अधिक जागा मिळतील, असे जेडीयूने म्हटले आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा असून यावेळी एकूण तीन टप्प्यांत मतदान पार पडले आहे.

Bihar Election Result Live:…तर बिहारमध्ये होणार भाजपाचा मुख्यमंत्री; नितीश कुमार यांच्या जेडीयूला जोरदार धक्का?

"कुणीही पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढणार नाही" -तेजस्वी यादव यांनी त्यांच्या घराबाहेर जमलेल्या नेत्यांना, मतमोजणी सुरू होण्यापूर्वी बोलावले आणि निवडणुकीचा निकाल काहीही आला, तरी कुणीही पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. ते म्हणाले, अनेक नेते कॅमेऱ्यासमोर पंतप्रधान मोदींविरोध बोलत आहेत, हे योग्य नाही. आता, अशा प्रकारची वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांवर कारवाईही केली जाऊ शकते, असा इशाराही तेज्वी यांनी यावेळी दिला आहे.

बिहारमध्ये प्रचंड बहुमताने बनणार एनडीए सरकार -भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी सोमवारी मतमोजणीच्या एक दिवस आधी दावा केला की, बिहारमध्ये एनडीए सरकार प्रचंड बहुमताने बनणार आहे आणि नितीशकुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारतील. त्यांनी एक निवेदन जारी केले, की बिहारमधील तीन टप्प्यांच्या निवडणुका संपल्यानंतर एक गोष्ट निश्चित आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि मोठ्या संख्येने मतदारांनी एनडीएच्या बाजूने मतदान केले आहे.

Bihar Assembly Election Result : तेजस्वी पर्व! बिहारमध्ये "मंगलराज" सुरू होईल - संजय राऊत

मध्य प्रदेश पोटनिवडणुकीच्या निकालातही भाजपाची विजयी घौडदोड -बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालासोबतच मध्य प्रदेशातील २८ जागांच्या पोटनिवडणुकीचे निकाल समोर येत आहेत, या पोटनिवडणुकीत भाजपाला सत्ता टिकवण्यासाठी ८ जागांची गरज आहे. या निकालाच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा १३ जागांवर तर काँग्रेस ७ आणि बसपा १ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

भाजपाने नितीश कुमारांप्रमाणे पाठिंबा दिल्यास स्वीकारणार का? शिवसेनेने दिले असे उत्तर...

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमार