बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेत पुन्हा एकदा मोठा चूक झाली आहे. नालंदा येथील सभेत त्यांच्यापासून जवळच ब़ॉम्ब फुटला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पंधरा दिवसांपूर्वीच नितीशकुमार यांना ठोसा लगावण्यात आला होता.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांची नालंदा येथे सभा आयोजित करण्यात आली होती. तिथे त्यांच्या सभेत बॉम्ब स्फोट झाला आहे. नितीश कुमार सुरक्षित असून त्यांनी या घटनेनंतर सभास्थळ सोडले आहे. २७ मार्चला पटनाच्या बख्तियारपुरमध्ये नितीशकुमारांच्या तोंडावर मुक्का मारण्यात आला होता.
सिलाव येथील गांधी हायस्कूलमध्ये जनसंवाद कार्यक्रम सुरू होता. नितीश कुमार यांच्यापासून अवघ्या 15-18 फूट अंतरावर बॉम्बचा स्फोट झाला. बॉम्ब स्फोटामुळे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या पेंडॉलमध्ये एकच गोंधळ उडाला. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या स्फोटात कोणाला दुखापत झाल्याचे समोर आलेले नाही. स्टेजच्या पाठीमागील शेतात बॉम्बचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे.