शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

Video: 'IAS बनून माझ्या अंडर काम कर', सोनूने तेजप्रताप यादवांना दिलं जबरदस्त उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 14:31 IST

बिहारच्या नालंदा येथील 12 वर्षीय सोनू सोशल मीडिया सेन्सेशन बनला आहे

पाटणा - बिहारमधील एका छोट्या चिमुकल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र आणि आमदार तेजप्रताप यादव यांना या लहानग्याने दिलेल्या उत्तराने अनेकांची मने जिंकली आहेत. सोनू नावाच्या या मुलाने तेजप्रताप यादव यांना रोखठोक शब्दात सुनावले. हे पाहून दिग्दर्शक विनोद कापरी यांना दिवार चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचीच आठवण झाल्याचं त्यांनी म्हटलं. 

बिहारच्या नालंदा येथील 12 वर्षीय सोनू सोशल मीडिया सेन्सेशन बनला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासमोर बिनधास्तपणे आपले गाऱ्हाणं मांडल्यामुळे सोनू चर्चेत आला. सरकारी शाळेतल्या शिक्षकाला इंग्रजी येत नाही, मला इंग्लीश मीडियमध्ये शिक्षण द्याव, अशी मागणीच त्याने नितीश कुमार यांच्याकडे केली होती. आता, राजदचे आमदार तेजप्रताप यादव यांनी व्हिडिओ कॉलद्वारे सोनूला साधलेला संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दिग्दर्शक विनोद कापरी यांनीही हा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे.

व्हायरल व्हिडिओत तेजप्रताप यादव हे व्हिडिओ कॉलिंगद्वारे चिमुकल्या सोनूचं कौतूक करत आहेत. मी तुझा फॅन झालोय, तू धाडसी आणि स्मार्ट मुलगा आहे. तू बिहारचा स्टार आहेस, असे तेजप्रताप यांनी म्हटलं. त्यावर, आपण काका या नात्यानं माझा शाळेत प्रवेश करुन द्या असे सोनूने म्हटले. त्यावर, तू मोठा होऊन काय बनणार आहेस, असा प्रश्न तेजप्रताप यांनी विचारला. त्यावर, मी आयएएस बनेल, असे उत्तर सोनून दिले. तेव्हा, मी बिहारच्या सरकारमध्ये येईल, तोपर्यंत तूही आयएएस होशील. मग, तू माझ्या अंडर काम करशील, असे तेजप्रताप यांनी म्हटलं. तेजप्रताप यांच्या प्रश्नावर सोनूने दिलेल्या उत्तराने तेजप्रताप हेही अवाक् झाले. मी कुणाच्याही अंडर काम करणार नाही, जर तुम्ही माझी मदत करत असाल तर धन्यवाद.. असे सडेतोड आणि बिनधास्त उत्तर सोनूने दिले. या उत्तरामुळे सोनूचा हा व्हिडिओ कॉल सगळीकडे व्हायरल झाला आहे.  दिग्दर्शक विनोद कापरी यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यामध्ये, लय भारी पोरगंय हे, स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा अंगात भिनलाय याच्या. हे पाहून अमिताभ बच्चन यांचा दिवार सिनेमा आठवला. ''मै आज भी फेके हुए पैसे नही उठाता'', अशी कमेंट आणि आठवण विनोद कापरी यांनी ट्विटरवर लिहिली आहे. 

टॅग्स :BiharबिहारTej Pratap Yadavतेज प्रताप यादवNitish Kumarनितीश कुमारnalanda-pcनालंदा