बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. "मी बक्सरच्या एसपींना हात जोडून माझ्या पत्नीला शोधण्याची विनंती करतो" असं एका व्यक्तीने म्हटलं आहे. बिहारमधील एका व्यक्तीची पत्नी बेपत्ता झाली आहे. यामुळे नवरा ढसाढसा रडत आहे. दोन मुलांची आई गेल्या एक महिन्यापासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. पत्नीचा शोध घेण्यासाठी पती महिनाभरापासून पोलिसांकडे चकरा मारत आहे. हे संपूर्ण प्रकरण बक्सरच्या सेमरी पोलीस ठाण्यातील आहे.
पप्पू हजम आपल्या पत्नीला शोधण्यासाठी सतत विनवणी करत आहे. पत्नी बेपत्ता झाल्याच्या दिवसापासून पप्पू वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दारात चकरा मारत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही काम झाले नाही. आतापर्यंत पत्नीला आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. त्याला आशा आहे की कोणीतरी दोन मुलांच्या आईला परत आणेल... मुलं रडत आहेत. त्यामुळे कुटुंबीय देखील त्रस्त आहे.
सेमरी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरनुसार, चंद्रपाली गावातील रहिवासी पप्पू हजामची पत्नी तारा देवी गेल्या महिन्याच्या 4 तारखेला एका महिलेसोबत घराबाहेर पडली, परंतु ती त्यानंतर घरी परतली नाही. त्यानंतर पप्पू आपल्या पत्नीचा सर्वत्र शोध घेत आहे. गेल्या महिन्याभरापासून पोलीस ठाण्यासह इतर ठिकाणी चकरा मारत आहे. पण अद्याप ती परत आलेली नाही किंवा तिचा मेसेजही आलेला नाही.
पप्पू हजामने दिलेल्या माहितीनुसार, 'मी काही दिवसांपासून पोलीस स्टेशनमध्ये चकरा मारतोय, पण आजतागायत कोणीही माझ्या पत्नीला शोधू शकलेलं नाही... मी बक्सरच्या एसपींना हात जोडून विनंती करतो की, माझ्या पत्नीचा शोध घ्या. या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांही बोलणे टाळत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.