शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
2
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
5
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
6
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
7
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
8
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
9
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
10
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
11
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
12
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
13
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
14
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
15
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
17
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
18
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
19
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
20
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या

Bihar By Election: बिहारचा निकाल धक्कादायक; नितीश-तेजस्वी सोबत मिळूनही भाजपला पराभूत करू शकले नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 7:03 PM

Bihar By Election: बिहारच्या कु़डणीतील पोटनिवडणूक नितीशकुमारांसाठी प्रतिष्ठेची बनली होती.

Bihar By Election: गुजरात, हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुका आणि मैनपुरी येथील लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या निकालांची देशभर चर्चा होत आहे. मात्र बिहारच्या कुडणी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल सर्वात धक्कादायक आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाचे जेडीयूचे उमेदवार मनोज कुशवाह यांचा पराभव झाला. 

ही जागा नितीशकुमार यांच्या प्रतिष्ठेची बनली होती. आरजेडीसोबत सरकार स्थापन केल्यानंतर नितीश कुमार यांच्यासाठी ही पहिलीच निवडणूक होती. नितीश स्वतःला ईसीबीचे नेते समजतात. यासोबतच जेडीयू-आरजेडीच्या मतांची टक्केवारी जोडली, तर बिहारमध्ये महाआघाडी इतकी मजबूत होते की भाजप त्याच्यासमोर कुठेही टिकत नाही.

कुडणीत भाजपचे उमेदवार केदार प्रसाद गुप्ता यांनी नितीश कुमार यांचे जेडीयू उमेदवार मनोज कुशवाह यांचा 3,645 मतांनी पराभव केला आहे. गुप्ता यांना 76,653 तर कुशवाह यांना 73,000 मते मिळाली. दरम्यान, या जागेवर भाजपची रणनीती कामी आल्याचे मानले जात आहे. बिहारमध्ये 15 टक्के सवर्ण, 26 टक्के अतिमागास आणि 16 टक्के दलितांची मते एकत्र आली, तर कोणत्याही पक्षाला बिहार जिंकणे सोपे आहे. नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपने असाच प्रयोग केला आहे. 

कुटणीत पोटनिवडणूक का झाली ?प्रवासी भत्ता घोटाळा प्रकरणी राजद आमदार अनिल साहनी यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना विधानसभा सदस्यत्व गमवावे लागले. यानंतर कुडणीत ही पोटनिवडणूक घ्यावी लागली. 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत साहनी यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी भाजपचे केदार गुप्ता यांचा सुमारे 700 मतांनी पराभव केला होता.

टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूकBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमार