बिहार मंत्रिमंडळ विस्तारावर कर्नाटक विजयाचा परिणाम, काँग्रेस अधिक मंत्रिपदाची मागणी करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 02:51 PM2023-05-15T14:51:07+5:302023-05-15T14:57:38+5:30

त्याचबरोबर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही अधिक जागांवर उमेदवार उतरवण्याबाबत महागठबंधनमध्ये दावा करू 

Bihar Cabinet Expansion Implications Of Karnataka Victory, Congress Will Demand More Ministerial Posts | बिहार मंत्रिमंडळ विस्तारावर कर्नाटक विजयाचा परिणाम, काँग्रेस अधिक मंत्रिपदाची मागणी करणार

बिहार मंत्रिमंडळ विस्तारावर कर्नाटक विजयाचा परिणाम, काँग्रेस अधिक मंत्रिपदाची मागणी करणार

googlenewsNext

विभाष झा -

पाटणा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेस नेत्यांचे मनोबल वाढले आहे. याची झलक केवळ कर्नाटकमध्येच नव्हे तर शेकडो किलोमीटर दूर असलेल्या बिहारमध्येही पाहण्यास मिळत आहे. 

कर्नाटकचे निकाल काँग्रेससाठी आशेचा किरण घेऊन आले आहेत. याचा परिणाम देश व अनेक राज्यांत होणाऱ्या आगामी निवडणुकांतही पाहावयास मिळू शकतो. उत्साहित कार्यकर्त्यांनी यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मतानुसार, कर्नाटकच्या निकालाचा परिणाम बिहारमध्येही पाहण्यास मिळेल. म्हणजेच बिहार मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेस आता अधिक मंत्री करण्याची मागणी करणार आहेत. त्याचबरोबर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही अधिक जागांवर उमेदवार उतरवण्याबाबत महागठबंधनमध्ये दावा करू 
शकते. 

महागठबंधनच्या सरकारमध्ये सहभागी सात पक्षांपैकी एक असलेल्या काँग्रेसचे सध्या दोन मंत्री आहेत. पक्षाची मागणी आहे की, ही संख्या ३ किंवा ४ करावी; परंतु याबाबत अद्याप सहमती झालेली नाही. आता कर्नाटक निवडणुकांचे निकाल येताच काँग्रेस नितीशकुमार सरकारवर दबाव आणणार आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. म्हणजेच मंत्रिमंडळात काँग्रेसच्या कोट्यातील मंत्र्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 
सूत्रांनी सांगितले की, प्रदेश नेतृत्वाने याबाबत आधीच तयारी करून ठेवली आहे. राज्य मंत्रिमंडळात काँग्रेसच्या कोट्यातून आणखी मंत्री केले जातील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश कुमार सिंह यांनी यापूर्वीच जाहीर केलेले आहे.

निवडणुकीबाबत तयारीला वेग
-  राज्यात आता लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. 
-  तथापि, काँग्रेसचे नेते याबाबत बोलत नाहीत. 
-  सूत्रांनी सांगितले की, काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाने सुमारे १२ नेत्यांना लढविण्याची तयारी केली आहे. 
-  यासाठी महागठबंधनमधील सात पक्षांत कसा समन्वय साधला जातो, हे लवकरच कळेल.
 

Web Title: Bihar Cabinet Expansion Implications Of Karnataka Victory, Congress Will Demand More Ministerial Posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.