शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
5
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
6
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
7
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
8
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
9
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
10
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
11
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
12
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
13
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
14
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
15
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
16
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
17
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
18
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
19
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

पुन्हा बिहार! नितीश कुमार आज उद्घाटन करणार होते; मेगा ब्रिजचा रस्ताच वाहून गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 12:28 PM

गेल्या महिन्यातही असाच नवा पूल पुरामुळे वाहून गेला होता. १६ जून रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या पूलाचं उद्धाटन केले होते. मात्र एक महिन्यात पाण्याच्या वेगवान प्रवाहात पूल तुटला होता.

बिहारमध्ये नव्याने निर्माण झालेले पूल कोसळण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. निवडणूक तोंडावर आल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार विकासकामांचे उद्घाटन करण्यामागे लागले आहेत. आज छपरामधील बंगरा घाट महासेतूला जाणारा अॅप्रोच रस्ताच उद्ध्वस्त झाला आहे. धक्कादायक म्हणजे या कामासाठी 509 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या पुलाचे नितीशकुमार आज उद्घाटन करणार होते. 

गेल्या महिन्यातही असाच नवा पूल पुरामुळे वाहून गेला होता. १६ जून रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या पूलाचं उद्धाटन केले होते. मात्र एक महिन्यात पाण्याच्या वेगवान प्रवाहात पूल तुटला होता. सत्तरघाट महासेतूचा हा पाळगंजमधील पूल होता. या प्रकारामुळे बिहार सरकारवर जोरदार टीका होऊ लागली होती. 

दरम्यान आज नितीश कुमार बंगरा घाट महासेतूच्या मेगा ब्रिजचे उद्घाटन करणार होते. त्यााधीच या पुलाकडे जाणार रस्ता खचला आहे. वैकुंठपूरमध्ये सारण बंधारा फुटल्याने बंगरा घाट महासेतूचा हा रस्ता वाहून गेल्याचे सांगितले जात आहे. जवळपास 50 मीटरचा रस्ता वाहून गेला असून बिहार राज्य पूल निर्माण निगमचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. दोनहून अधिक जेसीबी मशीन आणि शेकडो कामगारांना हा रस्ता पुन्हा बांधण्यासाठी कामाला लावण्यात आले आहे. 

या घटनेवर लालुप्रसाद यांच्यीा राजदने टोला लगावला आहे. गोपालगंजच्या बंगरा घाटचा पूल मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटनाआधीच तुटला आहे. आता भाजपा आणि जेडीयूवाले हा पूल नाही तर अॅप्रोच रोड होता, जसे काही हा रोड विरोधकांनीच बनविला, असा कांगावा करणार आहेत. मुख्यमंत्री तरीही उद्धाटन करणार आहेत. कारण आजकाल कोणत्याही नवीन, जुन्या, बेजार, तुटलेल्या गोष्टींचे उद्घाटन करण्याची परंपरा बनली आहे, अशी टीका केली आहे. बंगरा घाट महासेतूच्या छपरा बाजुला जवळपास 11 किमी आणि मुझफ्परपूरबाजुला 8 किमी लांब अॅप्रोच रस्ता बनविण्यात आला आहे. महासेतू आणि या अॅप्रोच रस्त्यासाठी 509 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Gold Rate Today : सोन्या, चांदीचे दर गडगडले; कोरोना व्हॅक्सिनचा प्रभाव

OMG! न्युझीलंडवर कोरोनाचा छुपा वार; 102 दिवसांनंतर 4 नवे रुग्ण, ऑकलंड लॉकडाऊन

CoronaVaccine: कोरोना लसीवर रशियाचा शॉर्टकट धोक्याचा; जागतिक तज्ज्ञांचा गंभीर इशारा

पंतप्रधान मोदी लवकरच मोठ्या घोषणा करण्याची शक्यता; हे आहेत अंदाज

खतरनाक Video! WWE मध्ये नव्या सुपरस्टार्सची एन्ट्री; रिंगच तोडल्याने भरली धडकी

चिनी कंपन्यांवर आयकर विभागाचे छापे; 1000 कोटींचे हवाला 'घबाड' हाती लागले

मध्यरात्री पानिपतच्या हायवेवर 'पती, पत्नी और वो'मध्ये धुमशान; दीराच्या मदतीने पकडले

Gold Rate: सोन्याची झळाळी! दिवाळीपर्यंत 70000 वर जाण्याची शक्यता; गुंतवणूक करायची का?

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेड