शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

"हिंदी राष्ट्रभाषा आहे, त्यामुळं यायलाच हवी", 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत नितीश कुमारांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 14:13 IST

'इंडिया' आघाडीच्या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार संतापल्याचे दिसले.

India Alliance Meeting Language Controversy | नवी दिल्ली : सत्ताधारी भाजपाला लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये रोखण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी एकजुट दाखवली असून 'इंडिया' आघाडीची स्थापना केली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विजयानंतर भाजपाचा आत्मविश्वास वाढला. पण, आगामी लोकसभेसाठी विरोधी पक्ष रणनीती आखताना दिसत आहेत. त्यासाठी सातत्याने बैठका घेऊन समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे, 'इंडिया' आघाडीतील पक्षांमधील आपापसातील मतभेदाच्या बातम्याही समोर येत आहेत. दिल्लीत झालेल्या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा संयम सुटला अन् त्यांनी हिंदी भाषेवरून आपल्याच मित्रपक्षाच्या नेत्याला सुनावले.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भाषणानंतर द्रमुकचे ( Dravida Munnetra Kazhagam ) खासदार टीआर बालू यांनी इंग्रजी अनुवाद करण्याची मागणी केली. यावर हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचे सांगताना नितीश कुमार म्हणाले की, प्रत्येक नेत्याला हिंदी भाषा माहित असणे आवश्यक आहे. नितीश यांच्या या आग्रहानंतर बैठकीतील वातावरणात तापले होते. खरं तर द्रमुकची भूमिका आणि त्यांचे राजकारण हे नेहमी हिंदीविरोधी राहिले आहे. अशा परिस्थितीत या भाषा वादावरून 'इंडिया' आघाडीत मतभेद समोर आले आहेत. 

हिंदी अनुवादाची मागणी अन् नाट्यमय घडामोडी दरम्यान, नितीश कुमार 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत संबोधित करत असताना DMK प्रमुख एके स्टॅलिन आणि टीआर बालू उपस्थित होते. नितीश हिंदीत बोलत असल्याने त्यांचे म्हणणे द्रमुकच्या नेत्यांना समजले नाही. टीआर बालू यांनी दुसरीकडे बसलेले आरजेडीचे राज्यसभा खासदार मनोज झा यांच्याकडे इशारा करत नितीश यांच्या भाषणाचा अनुवाद मागितला. अर्थात नितीश यांचे भाषण इंग्लिशमध्ये समजवण्याची विनंती बालू यांनी केली. मनोज झा यांनी नितीश कुमार यांच्या भाषणाचा अनुवाद करण्याची मागणी करताच नितीश यांना राग अनावर झाला. "आपण आपल्या देशाला हिंदुस्थान म्हणतो आणि हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. ही भाषा आपल्याला कळलीच पाहिजे", असे नितीश यांनी सांगून मनोज झा यांना भाषणाचा अनुवाद न करण्यास सांगितले.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBiharबिहारhindiहिंदीenglishइंग्रजी