Nitish Kumar and KCR Viral Video:तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) बिहारच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात अशी एक घटना घडली, ज्यामुळे सध्या त्यांची चर्चा होत आहे. केसीआर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात नितीश कुमार केसीआर यांना उठायला सांगत आहेत तर केसीआर नितीश कुमारांना बसायला सांगत आहेत.
पत्रकार परिषदेत केसीआर यांना पत्रकारांना विचारले की, विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल? हा प्रश्न ऐकून केसीआरसोबत बसलेले नितीश कुमार उभे राहिले निघणार, तेवढ्यात केसीआरला यांनी त्यांच्या हाताला पकडून खाली बसायला सांगितले. पण, नितीश कुमार काही खाली बसायला तयार दिसत नव्हते, ते पत्रकारांना प्रश्न विचारू नका, असे सांगू लागले. तसेच, केसीआर यांनाही प्रश्नांची उत्तरे देऊ नका, असे म्हणताना व्हिडिओ दिसत आहे.
भाजप प्रवक्ते शहदाज पुनावाला यांनी व्हिडिओ शेअर केला आहे:-
यावेळी केसीआर पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देत होते, तर नितीश कुमार निघण्याच्या घाईत होते. केसीआर यांनी नितीश कुमार यांचा हात धरला आणि म्हणाले, 'नेताजी, तुम्ही प्लीज खाली बसा...' यावर नितीश कुमार पत्रकारांना म्हणाले, आम्ही तुम्हाला बराच वेळ दिलाय, आता प्रश्न विचारू नका. हा सगळा सावळा गोंधळ पाहून उपस्थित सर्व लोक मोठ्याने हसू लागले.
यावेळी केसीआर यांनी पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर दिले. ते म्हणाले, तुम्ही जर स्मार्ट असाल तर मी तुमच्यापेक्षा डबल स्मार्ट आहे. सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यानंतर सर्वसहमतीने जो निर्णय घेतला जाईल, त्याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देऊ.