बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसने आता पुढे यावे आणि विरोधी एकजुटीला उशीर करू नये, असं वक्तव्य नितीशकुमार यांनी केले आहे.
पाटणा येथे झालेल्या सीपीआय-एमएलच्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हे वक्तव्य केले. नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणुकांवरुनही मोठं वक्तव्य केलं. 'मला नेतृत्वाची वैयक्तिक इच्छा नाही. आम्हाला फक्त बदल हवा आहे. प्रत्येकजण जे ठरवेल ते होईल. आता काँग्रेसने पुढचा निर्णय घ्यावा आणि विरोधी एकजुटीत दिरंगाई करू नये, आम्ही वाट पाहत आहोत, असंही नितीश कुमार म्हणाले.
'आम्ही दिल्लीला जाऊन दोघांना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना भेटलो भेटलो. यावेळी सलमान खुर्शीद यांना सांगितले की, तुमच्या माध्यमातून काँग्रेस नेतृत्वाला आवाहन आहे की, सर्वांनी एकत्र आल्यास भाजप 100 च्या खाली बसेल. बिहारमध्ये विरोधी पक्ष एकजुटीने काम करत आहेत.
'भाजपला भारताला नथुराम गोडसेचा देशा बनवायचाय; उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा हल्लाबोल
'जेव्हा ते एनडीएपासून वेगळे झाले तेव्हा सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. 2024 मध्ये सर्व विरोधी पक्ष एकजुटीने लढतील, तरच भाजपचा आपण पराभव करु शकू. आज स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व धर्म आणि जातीच्या लोकांना एकत्र यावे लागेल, असंही नितीश कुमार म्हणाले.
'भाजपला भारताला नथुराम गोडसेचा देशा बनवायचाय; उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा हल्लाबोल
'भाजप केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून भारताला नथुराम गोडसेचे राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे', अशी घणाघाती टीका बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रकाश यांनी केली. बीबीसी कार्यालयातील आयकर सर्वेक्षणावर बोलताना त्यांनी ही टीका केली. असी छापे टाकून केंद्र सरकारला संदेश द्यायचा आहे की जो कोणी सरकारविरोधात बोलेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा आरोपही तेजस्वी यादव यांनी केला.
'बीबीसीचे काय झाले ते तुम्हा सर्वांना माहित आहे. गुजरातमध्ये काय झाले हे सर्वांना माहीत आहे. त्यांना महात्मा गांधींचा देश नथुराम गोडसेच्या देशात बदलायचा आहे. ते हिंदु राष्ट्राबद्दल बोलतात पण आपली विविधता हेच आपले सौंदर्य आहे, असंही तेजस्वी यादव म्हणाले.