पाटणा - निवडणुका जवळ आल्या की राजकीय नेत्यांना प्रभू राम आठवतात. राम मंदिर उभारणीचे आश्वासन देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न नेत्यांकडून केला जात असल्याचे सध्या पाहायला मिळते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पार्टींकडून निरनिराळ्या अंदाजात प्रचार करण्यात येत आहे. यादरम्यानच, काँग्रेसचे एक पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. या पोस्टरमध्ये राहुल गांधी यांना राम अवतारात दाखवण्यात आले आहे.
राहुल गांधी यांचा प्रभू राम अवतारातील पोस्टर बिहारची राजधानी पाटणामध्ये लावण्यात आला आहे. पाटणामध्ये 3 फेब्रुवारीला काँग्रेसची जन आकांक्षा रॅली होणार आहे. या रॅलीपूर्वी शहरात काँग्रेसनं पोस्टरबाजी केली आहे. शहरात ठिकठिकाणी राहुल गांधींचे राम अवतारातील पोस्टर झळकावण्यात आले आहेत.
हिंदीमध्येही वाचा ही बातमी :
(शिवभक्त के बाद अब राम अवतार में दिखे राहुल गांधी, पोस्टर में बीजेपी को किया तंज)राहुल गांधींव्यतिरिक्त प्रियंका गांधी, सोनिया गांधी यांच्यासहीत काँग्रेसमधील अनेक दिग्गजांचे फोटो पोस्टरवर दिसत आहेत. ''वे राम नाम जपते रहे, तुम बनकर राम जियो रे'', असा मजकूरही पोस्टरवर लिहिण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेसकडून करण्यात आलेल्या बॅनरबाजीवर भाजपानं जोरदार हल्लाबोल चढवला आहे. यापूर्वीही काँग्रेसकडून अशा प्रकारची बॅनरबाजी करण्यात आली होती.