ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - नितीश कुमार सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला असून बिहारमधील दारुबंदी उठवण्याच्या पाटना उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे बिहारमध्ये दारुबंदी कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दारुबंदी आणि मुलभूत हक्क या दोन्ही गोष्टी एकत्र येऊ शकत नाहीत असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. पाटना उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
पाटणा उच्च न्यायालयाने बिहार सरकारने केलेल्या दारुबंदी कायद्याला बेकायदा ठरवत हा कायदा रद्द केला होता. एक ऑगस्ट रोजी बिहार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दारुबंदी विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यपाल राम नाथ कोविंद यांनी या विधेयकाला मंजुरी दिली होती.