पाटणा -नितीश कुमार सरकार, बिहार (Bihar ) विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यातील जनतेला दिलेले मोफत कोरोना लशीचे (corona vaccine) आश्वास पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. आजपासून खासगी रुग्णालयांतून देण्यात येणाऱ्या कोरोना लशीचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल, असे बिहार सरकारने म्हटले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish kumar) यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या एका महत्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (Bihar corona vaccine to be free of cost in private hospitals Nitish kumar goverment fulfills their promise)
आजपासून संपूर्ण देशातील खासगी रुग्णालयांत 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना तसेच 45 वर्षांवरील गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना लस देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांत लशीच्या प्रत्येक डोसची किंमत जास्तीत जास्त 250 रुपये ठेवली आहे. मात्र, बिहारमध्ये ही लस लोकांना मोफत टोचली जाणार आहे. आपण पुन्हा सत्तेत आलो, तर बिहारमधील प्रत्येक नागरिकाला कोरोनालस मोफत दिली जाईल, असे आश्वासन भाजपने बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात दिले होते.
आता चीननंही दिली 'सिंगल डोस' कोरोना लशीला मंजुरी, जॉन्सन अँड जॉन्सनला टक्कर देण्याचा प्रयत्न
याच पार्श्वभूमीवर सरकार स्थापन झाल्यानंतर नितीश कॅबिनेटने बिहारमधील प्रत्येक नागरिकाला मोफत कोरोना लस दिली जाण्यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली होती.
नितीश कुमारही घेणार कोरोना लस -देशभरात आज लसिकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. मुख्यमंत्री नितीश कुमारही आज कोरोना लशीचा पहिला डोस घेतली. नितीश कुमार सोमवारी 1:00 वाजता आयजीआयएमएस रुग्णालयात जाऊन तेथे लसिकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करतील. यावेळी ते स्वतःही लस घेतील. आज नितीश कुमारांचा वाढदिवसही आहे आणि याच दिवशी त्यांनी बिहारमधील जनतेला मोठी भेट दिली आहे.
अमेरिकेनं भारताकडून घेतलंय 216 अब्ज डॉलरच कर्ज, प्रत्येक नागरिकाच्या डोक्याव लाखोंच ऋण
मोदींनीही घेतली कोरोना लस -देशात आजपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेलाही कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले आहे.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, "एम्स रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केले, ते कौतुकास्पद आहे." तसेच, लसीकरणासाठी पात्र असलेल्यांना आवाहन करत भारत कोरोनामुक्त बनवूयात, असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
कोरोनाची लस टोचून घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नर्सला म्हणाले...