शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

३ वर्षाच्या मुलीची हत्या करुन आईने सूटकेसमध्ये भरला मृतदेह; कारण ऐकून कुटुंबिय हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 6:39 PM

बिहारमध्ये प्रियकरासाठी एका महिलेने आपल्या पोटच्या मुलीची चाकूने गळा चिरुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Bihar Crime :बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एका आईने प्रियकरासाठी आपल्या तीन वर्षांच्या मुलीची हत्या केली. मुलीचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून घराच्या छतावरून फेकून दिला होता. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक घरातून अटक केली आहे. हृदयाच्या तुकड्याला मारण्याइतकी कोणतीही आई क्रूर असू शकत नाही, पण हे सर्व घडले आहे आणि तेही दिवसाढवळ्या. प्रेमाच्या वेडात आई इतकी गुंग झाली की तिने चाकूने मुलीचा जीव घेतला. ज्या घरातून पोलिसांनी महिलेला अटक केली ते तिच्या प्रियकराचे आहे. मुलीचा खून केल्यानंतर ती महिला प्रियकराच्या पोहोचली होती. पण या खुनाची आपल्याला कल्पना नव्हती, असे प्रियकराने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी महिलेच्या प्रियकराचीही कसून चौकशी केली.

मुझफ्फरपूरच्या मिठानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबाग परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली. गेल्या आठवड्यात शनिवारी एका बंद सुटकेसमधून तीन वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी मृतदेह सापडल्यानंतर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला होता. पोलिसांनी तपास सुरू केला असता ही मनोज कुमार यांची तीन वर्षांची मुलगी मिस्टी असल्याचे समोर आलं. मात्र या घटनेनंतर मृत मुलीची आई घरातून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी मृत मुलीची आई काजल हिचा कसून तपास सुरु केला होता. शेवटी काजल ही पोलिसांना प्रियकराच्या घरात सापडली.

आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले की, "फेसबुकच्या माध्यमातून ती एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. मात्र प्रियकर माझी मुलगी दत्तक घेण्यास तयार नव्हता. माझे माझ्या प्रियकरावर खूप प्रेम होते आणि मी त्याच्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार होती. जेव्हा मला वाटलं की माझा प्रियकर माझ्यापासून दूर जात आहे, तेव्हा मी आपल्या मुलीला दूर करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी नवरा दुकानात गेल्याने  संधीचा फायदा घेत भाजी कापण्याच्या चाकूने मिस्टीचा गळा चिरून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह घरात ठेवलेल्या सुटकेसमध्ये टाकून घराशेजारी फेकून दिला. त्यानंतर घरातून दागिने, पैसे आणि आधारकार्ड घेऊन मी प्रियकराकडे पळून गेली."

दरम्यान, मुलीच्या हत्येपासून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापर्यंत आणि घरातील रक्ताचे डाग साफ करण्यापर्यंतचे संपूर्ण काम महिलेने दोन तासांत एकटीने पूर्ण केले. ज्या वेळी मुलीची हत्या झाली तळमजल्यावर राहणारी वृद्ध महिला मुलाला पाहण्यासाठी रुग्णालयात गेली होती. तर काजलचा नवरा दुकानात गेला होता. त्यामुळे घरात काजल आणि तिच्या मुलीशिवाय कोणीच नव्हते. याचा फायदा घेत महिलेने दुपारी दीड ते साडेतीनच्या दरम्यान मुलीचा खून केला.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस