"शिक्षणमंत्र्यांनाच राष्ट्रगीत येत नाही", काँग्रेस नेत्यानं VIDEO शेअर करत केला 'पंचनामा'!
By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 18, 2020 07:54 PM2020-11-18T19:54:21+5:302020-11-18T19:57:19+5:30
चौधरी यांना देशाचे राष्ट्रगीतही म्हणता येत नाही, असा टोला एका काँग्रेस नेत्याने लगावला आहे. विशेष म्हणजे या काँग्रेस नेत्याने यासंदर्भातील एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर करत, या मंत्री मोहोदयांच्या ज्ञानाचा पार 'पंचनामा' केला आहे.
पाटणा -बिहारमध्ये नुकतेच भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार स्थापन झाले आहे. नितीश कुणार हे या सरकारमध्ये मुख्यमंत्री आहेत. मात्र, या सरकारमध्ये शिक्षणमंत्री म्हणून ज्यांची वर्णी लागली आहे, त्या मोवालाल चौधरी यांना देशाचे राष्ट्रगीतही म्हणता येत नाही, असा टोला एका काँग्रेस नेत्याने लगावला आहे. विशेष म्हणजे या काँग्रेस नेत्याने यासंदर्भातील एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर करत, या मंत्री मोहोदयांच्या ज्ञानाचा पार 'पंचनामा' केला आहे.
बिहारमद्ये एनडीएचे सरकार स्थापन होऊन अद्याप दोन दिवसही झाले नाहीत, तोच या सरकारवर टीका व्हायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत थेट शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी यांचाच पंचनामा केला आहे. नव्हे, निरुपम यांनी शिक्षणमंत्र्यांच्या गुणवत्तेवरच बोट ठेवले आहे.
शिक्षणमंत्र्यांना राष्ट्रगीतही म्हणता येत नाही -
संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्येही मंत्री महोदय राष्ट्रगीत गाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करत निरुपम यांनी लिहिले आहे, "हे आहेत बिहारचे नवे शिक्षणमंत्री. म्हटले जाते, की, महाशय एका विद्यापीठाचे कुलगुरू होते. पण त्यांना राष्ट्रगीतदेखील म्हणता येत नाही. यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत, ते वेगळेच. भारतीय लोकशाहीतील हे पाप कोण धुणार?," मात्र, निरुपम यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओतील व्यक्ती शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी हेच आहेत, की कुणी आणखी, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी हे भागलपूर कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.
ये बिहार के नए शिक्षा मंत्री हैं।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) November 18, 2020
कहते हैं, ये जनाब पहले किसी विश्वविद्यालय के वाइस चांसलर थे।
राष्ट्रगान भी नहीं गा पाते।
भ्रष्टाचार के संगीन आरोप इन पर है,सो अलग।
भरतीय लोकतंत्र के इन पापों को कौन धोएगा ?pic.twitter.com/LRbaYVeutK
यापूर्वी राष्ट्रीय जनता दलानंही आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला होता हा व्हिडिओ -
यापूर्वी, बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात (Bihar Assembly Election) हाच व्हिडिओ राष्ट्रीय जनता दलानेही आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर करून आरजेडीने नीतीश कुमार (Nitish Kumar) यांच्या सरकारवर पहिला हल्ला चढवला होता. मेवालाल चौधरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. असे आरोप असणाऱ्या मेवालाल चौधरी यांना राज्यचे शिक्षणमंत्री केल्याने राज्यातील राजकारण तापले आहे.