शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

"शिक्षणमंत्र्यांनाच राष्ट्रगीत येत नाही", काँग्रेस नेत्यानं VIDEO शेअर करत केला 'पंचनामा'!

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 18, 2020 19:57 IST

चौधरी यांना देशाचे राष्ट्रगीतही म्हणता येत नाही, असा टोला एका काँग्रेस नेत्याने लगावला आहे. विशेष म्हणजे या काँग्रेस नेत्याने यासंदर्भातील एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर करत, या मंत्री मोहोदयांच्या ज्ञानाचा पार 'पंचनामा' केला आहे.

पाटणा -बिहारमध्ये नुकतेच भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार स्थापन झाले आहे. नितीश कुणार हे या सरकारमध्ये मुख्यमंत्री आहेत. मात्र, या सरकारमध्ये शिक्षणमंत्री म्हणून ज्यांची वर्णी लागली आहे, त्या मोवालाल चौधरी यांना देशाचे राष्ट्रगीतही म्हणता येत नाही, असा टोला एका काँग्रेस नेत्याने लगावला आहे. विशेष म्हणजे या काँग्रेस नेत्याने यासंदर्भातील एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर करत, या मंत्री मोहोदयांच्या ज्ञानाचा पार 'पंचनामा' केला आहे.

बिहारमद्ये एनडीएचे सरकार स्थापन होऊन अद्याप दोन दिवसही झाले नाहीत, तोच या सरकारवर टीका व्हायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत थेट शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी यांचाच पंचनामा केला आहे. नव्हे, निरुपम यांनी शिक्षणमंत्र्यांच्या गुणवत्तेवरच बोट ठेवले आहे. 

शिक्षणमंत्र्यांना राष्ट्रगीतही म्हणता येत नाही -संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्येही मंत्री महोदय राष्ट्रगीत गाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करत निरुपम यांनी लिहिले आहे, "हे आहेत बिहारचे नवे शिक्षणमंत्री. म्हटले जाते, की, महाशय एका विद्यापीठाचे कुलगुरू होते. पण त्यांना राष्ट्रगीतदेखील म्हणता येत नाही. यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत, ते वेगळेच. भारतीय लोकशाहीतील हे पाप कोण धुणार?," मात्र, निरुपम यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओतील व्यक्ती शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी हेच आहेत, की कुणी आणखी, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी हे भागलपूर कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.

यापूर्वी राष्ट्रीय जनता दलानंही आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला होता हा व्हिडिओ - यापूर्वी, बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात (Bihar Assembly Election) हाच व्हिडिओ राष्ट्रीय जनता दलानेही आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर करून आरजेडीने नीतीश कुमार (Nitish Kumar) यांच्या सरकारवर पहिला हल्ला चढवला होता. मेवालाल चौधरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. असे आरोप असणाऱ्या मेवालाल चौधरी यांना राज्यचे शिक्षणमंत्री केल्याने राज्यातील राजकारण तापले आहे.

 

टॅग्स :Sanjay Nirupamसंजय निरुपमBiharबिहारEducation Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षणministerमंत्रीcongressकाँग्रेस