पाटणा -बिहार विधानसभा निवडणुकीचा नारळ फुटला आहे. सर्वच पक्षांनी आपापले दंड थोपटले आहेत. यातच आज भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 30 स्टार प्रचारकांची यादी जारी केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पहिल्या स्थानावर आहेत. तर, गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि महाराष्ट्रातील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही या यादीत समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नीतीश कुमार, हे सोबतच निवडणूक प्रचार करणार आहेत. (Bihar assembly election 2020)
सुरेश रुंगटा यांनी रविवारी भाजपाच्या या 30 स्टार प्रचारकांची यादी जारी केली. या यादीत पहिल्या क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसऱ्या क्रमांकावर भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, तिसऱ्या क्रमांकावर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, तर चौथ्या क्रमांकावर गृह मंत्री अमित शाह आहेत. या यादीत बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचाही समावेश आहे.
यादीत योगी आदित्यनाथांचाही समावेश -स्टार प्रचारकांच्या यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, भाजपाचे सरकार असलेल्या इतर कुठल्याही राज्यातील मुख्यमंत्र्याचा या यादीत समावेश करण्यात आलेला नाही.
मोदी-नितीश सोबतच करणार रॅली -मोठे वृत्त असेही आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा मुख्यमंत्री नितीश कुमार सोबतच रॅली करतील. मात्र, यासंदर्भातील कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. यासंदर्भात बोलताना जेडीयू नेते संजय झा म्हणाले, यामुळे लोकांमध्ये पसरवले जात असलेले गैरसमज दूर होतील. याचवेळी भाजपा आणि जेडीयूची आघाडी भक्कम असल्याचेही ते म्हणाले.
अशी आहे भाजपाच्या स्टार प्रचारकांची यादी -