ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ५ - बिहार विधानसभेच्या निवडणुकांचे एग्झिट पोल यायला सुरुवात झाली असून भाजपा प्रणीत रालोआ व नितिश कुमार मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असलेली महाआघाडी यांच्यात अत्यंत चुरशीची लढत असून दोघांनाही ११० ते १३० च्या दरम्यान, म्हणजे जवळपास सारख्याच जागा मिळतिल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, अत्यंत काटे की टक्कर झालेल्या या लढतीत सिसेरो वगळता बाकी सगळ्या एग्झिट पोल्सनुसार पाच ते १० जागांनी का होईना नितिशकुमारांच्या नेत-त्वाखालील महाआघाडी रालोआच्या पुढे असणार आहे. दोन्ही आघाड्यांना ४० ते ४२ टक्के मतं मिळाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भाजपाच्या नेत्यांनी या निवडणुकीत नितिशकुमारांची एग्झिट होईल असा दावा केला आहे तर महाआघाडीच्या नेत्यांनी बिहारी जनतेने नरेंद्र मोदी व भाजपाला पराभूत केल्याचा दावा केला आहे.
जर भाजपा काही थोड्या जागांमुळे सत्तेपासून लांब राहिली असेल तर त्याचं कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आरक्षणाचा फेरविचार करण्याची मागणी असं मत काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
सी व्होटरच्या एग्झिट पोलनुसार
महागठबंधन - ४२ टक्के मतं आणि १२२ जागा मिळतील.
भाजपाप्रणीत रालोआला ४१ टक्के मतं १११ जागा मिळतील.
इतर - १० जागा.
इंडिया टुडे-आयटीजी सिसेरोच्या एक्झिट पोलनुसार
भाजपाप्रणित रालोआला १२० जागा.
महागठबंधनला ११७ जागा मिळतील
इतर - ६ जागा
न्यूज एक्स - सीएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार
महागठबंधनला १३० ते १४० जागा.
भाजपाप्रणित रालोआला ९० ते १०० जागा.
इतर - १३ ते २३ जागा.
न्यूज नेशनच्या एक्झिट पोलनुसार
भाजपाप्रणित रालोआला ११५ ते ११९ जागा
महागठबंधनला १२० ते १२४ जागा.
इतर ३ ते ५ जागा.
एबीपी न्यूज- निल्सनच्या एक्झिट पोलनुसार
महाआघाडीला १३० जागा
भाजपाप्रणित रालोआला १०८ जागा
इतर पक्षांना ५ जागा.
न्यू२४ - टुडेज चाणक्य एग्झिट पोलनुसार
भाजपाप्रणीत रालोआला १५५ जागा
महाआघाडीला ८३ जागा
इतर पक्षांना ५ जागा.