पाटणा, दि. 29 - जनता दल युनायटेडचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी गुरुवारी सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. पाटण्यातील राजभवनात नितीश कुमार सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी सुरु आहे. बुधवारी संध्याकाळी नितीश कुमारांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये वेगवान घडामोडी घडल्या. बिहारमध्ये भाजपा-जदयू ही नवी आघाडी आकाराला आली. नितीश भाजपाच्या पाठिंब्याने पुन्हा मुख्यमंत्री झाले.
शुक्रवारी जदयू -भाजपाच्या सरकारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सभागृहात बहुमत सिद्ध केले.सरकारच्या बाजूने १३१ तर विरोधात १०८ मते पडली. बहुमतासाठी १२२ सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता होती. विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेत भाग घेताना नितीश कुमार यांनी भ्रष्टाचार आणि अन्याय करणाºयांना बिहार खपवून घेणार नाही, असे स्पष्ट करून विरोधकांचा समाचार घेतला.
तर, राजदचे नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनीही नितीश कुमार यांच्यावर जोरदार पलटवार केला. भाजपासोबतच जायचे होते तर आमच्यासह सरकार का बनविले, असा सवाल करून तेजस्वीप्रसाद म्हणाले की, हे सर्व एकाच व्यक्तीच्या स्वार्थासाठी केले गेले. हिंमत असती तर नितीश कुमार यांनी मला बरखास्त करून दाखविले असते. पण तसे न करता नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेचा अपमान केला.
विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेत बोलताना नितीश कुमार यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, वेळ येईल तसे प्रत्येक गोष्टीचे उत्तर देईन. आज जुम्मा (शुक्रवार) असल्याने सभागृहाचा वेळ वाया जाऊ नये असे आपल्याला वाटते.
गुप्त मतदानाची मागणी फेटाळली२४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत नितीश कुमार यांच्याकडे ७१ सदस्य आहेत. तर, सरकारमधील मित्र पक्ष भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएकडे अपक्षांसह ६१ आमदार आहेत. यात भाजपाचे (राजग-लोजपा, रालोसपा आणि हम) ५८ आमदार आहेत. जदयूचे एक ज्येष्ठ नेते शरद यादव हे नाराज असल्याच्या चर्चा येथे सुरू असतानाच या परिस्थितीतही नितीश कुमार यांनी बहुमत सिद्ध केले आहे. लालूप्रसाद यादव यांच्या राजदने गुप्त मतदानाची मागणी केली होती. पण, विधानसभा अध्यक्ष विजय चौधरी यांनी ही मागणी फेटाळून लावली
BJP's Vinod Kumar Singh & Krishna Kumar Rishi and JD(U)'s Madan Sahni take oath as ministers in #Bihar government. #NitishKumarpic.twitter.com/KtNDQ6VgzL
— ANI (@ANI_news) July 29, 2017
JD(U)'s Santosh Kumar Nirala & Khurshid alias Firoz Ahmad and BJP's Rana Randhir Singh take oath as ministers in #Bihar government pic.twitter.com/L7MOjAgJmW
— ANI (@ANI_news) July 29, 2017
BJP's Suresh Kumar Sharma & Vijay Kumar Sinha and JD(U)'s Kumari Manju Verma take oath as ministers in #Bihar government. pic.twitter.com/pYm2GQZoTV
— ANI (@ANI_news) July 29, 2017