नवी दिल्ली : दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने २०१९-२० साठी केलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्यात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. देशात मद्यप्राशन करणाऱ्यांचे सर्वात कमी प्रमाण जम्मू-काश्मीर, गुजरातमध्ये आहे.सर्वेक्षणात १५ वर्षे वयावरील ६.१ लाख व्यक्तींचा सहभागदेशातील महिलांमध्ये मद्यप्राशनाचे सर्वाधिक प्रमाण सिक्किममध्ये असून ते १६.२ टक्के आहे. त्यानंतर, हे प्रमाण आसाममध्ये ७.३ टक्के, तर तेलंगणा, गोवा व मणिपूरमध्ये अनुक्रमे ६.७ टक्के, ५.५ टक्के व ०.९ टक्के आहे. बहुतांश राज्यात शहरी भागातील महिलांपेक्षा ग्रामीण परिसरातील महिलांमध्ये मद्यप्राशनाचे प्रमाण अधिक असले, तरी त्या आकड्यांत खूप मोठा फरक नाही.मिझोराममध्ये तंबाखूचे सर्वाधिक सेवन मिझोराममध्ये ६२ टक्के महिला व ७७.८ टक्के पुरुष तंबाखूचे सेवन करतात. देशातील हे सर्वाधिक प्रमाण आहे. केरळमध्ये फक्त १७ टक्के पुरुष व १८ टक्के महिलांना तंबाखूचे व्यसन आहे. मात्र, देशात गोव्यामध्ये तंबाखूच्या व्यसनाचे प्रमाण सर्वात कमी आहे.
काय सांगता? दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त मद्यपी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 2:53 AM