आरा : भाजपा सत्तेवर आली तर बिहार विकासाचे नवे शिखर गाठेल, असे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या बिहारसाठी तब्बल १.२५ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले.बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार पाटणा येथे मोंदींच्या स्वागतासाठी हजर होते, पण आरा येथील कार्यक्रमाला ते गेले नाहीत. मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजवर त्यांनी नंतर टिष्ट्वटरवरून टीका केली व केंद्राकडे पैसे मागणे ही याचना नसून बिहारचा तो हक्क आहे, असे म्हटले. माजी मुख्यमंत्री व राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनीही विशेष दर्जाऐवजी केवळ पॅकेजवर बोळवण करण्यात आली आहे व हे पॅकेज म्हणजे निव्वळ ‘चुनावी जुमला’ आहे, अश्ी टिका टिष्ट्वटरवर केली.‘मी बिहारसाठी १.२५ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करीत आहे. परंतु सव्वा लाख कोटी रुपयांचे नवे पॅकेज आणि ४० हजार कोटी रुपये जुने असे एकूण १.६५ लाख कोटी रुपये या राज्याला मिळतील,’ असे मोदी म्हणाले. आरा येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि पूर्वीच्या संपुआ सरकारवर टीका करताना मोदी म्हणाले, त्यावेळचे मुख्यमंत्री दिल्लीत पोहोचले. बिहारचा स्वाभिमान गहाण ठेवला. राज्याचा स्वाभिमान सोडून दरबारात गेले. याचना केली. प्रतिष्ठा सोडून काही मागितले. पण दिल्लीतील संपुआ सरकारने केवळ १२ हजार कोटी रुपये दिले. ‘तुम्हाला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी मी येथे आलो आहे. बिहारसाठी मी १.२५ लाख कोटींचे पॅकेज जाहीर करीत आहे. आता बिहारचे भाग्य बदलण्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या. केवळ विकासानेच राज्याचा फायदा होईल आणि गरिबी दूर होईल,’ असे मोदी यांनी सांगितले.बिहार आता ‘बिमारू’ राहिलेले नाही, हा नितीशकुमार यांचा दावा खोडून काढताना मोदी म्हणाले, असे असेल तर मुख्यमंत्री सदासर्वदा आर्थिक पॅकेजची मागणी का करतात, आपले मुख्यमंत्री खवळले आणि बिहारला बिमारू राज्य म्हणणारे मोदी कोण लागून गेले, असे म्हणाले. बिहार आता बिमारू राज्य राहिलेले नाही असा दावाही त्यांनी केला होता. हे जर खरे असेल तर मला सर्वाधिक आनंद होईल. मी त्याचे स्वागतच करीन. पण मला सांगा, एखादा निरोगी असेल तर तो डॉक्टरकडे जाईल काय, एखाद्याचे पोट भरले असेल तर तो जेवण मागायला जाईल काय, एकीकडे ते म्हणतात की बिहार आता बिमारू राज्य राहिलेले नाही आणि दुसरीकडे कुणाला ना कुणाला काही ना काही मागतच असतात,’ असे मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)
बिहारला १.२५ लाख कोटींचे पॅकेज
By admin | Published: August 19, 2015 12:44 AM