पाटणा -बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची (Lalu Prasad Yadav) प्रकृती खालावली आहे. प्रकृती खालावल्याने पाटणा येथे आलेले आरजेडी (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव बुधवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. त्यांच्यासोबत पत्नी राबडी देवी, (Rabri Devi), मोठी मुलगी मीसा भारती (Misa Bharti) आणि छोटा मुलगा तेजस्वीही (Tejashwi Yadav) आहेत. निवडणूक निकाल आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी, हे सर्व जण दिल्लीला रवाना झाल्याने सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधणे सुरू केले आहे.
पाटणा विमानतळावर पोहोचल्यानंतर आपली प्रकृती ठीक नसून आपण उपचारासाठी दिल्लीला जात आहोत, असे लालू प्रसाद यादव यांनी सांगितले. बिहारमध्ये नुकतीच दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली. यासाठी लालू प्रसाद हे पाटण्याला आले होते. यावेळी त्यांनी 27 ऑक्टोबरला कुशेश्वरस्थान येथे निवडणूक रॅलीलाही संबोधित केले.
लालू प्रसाद यादव यांना विमानतळावर आधार देऊन गाडीतून खाली उतरविण्यात आले. चारा घोटाळ्यातील दोशी लालू प्रसाद हे पाटण्यात आले होते. यापूर्वी लालू दिल्लीतच त्यांची मुलगी मीसा भारती यांच्या घरी राहत होते.
जेडीयूचा टोला - जेडीयू प्रवक्ता आणि माजी मंत्री नीरज कुमार (Neeraj Kumar) यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करत लालू कुटुंबावर निशाना साधला आहे. कवितेच्या स्वरुपात करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये कुमार यांनी म्हटले आहे..."राजनैतिक शहजादे को बिहारियों का ख्याल कहाँ आताचुनाव आते ही सपरिवार बिहार आताचुनाव में भ्रामक मुद्दे उछाल जाताचुनाव परिणाम खिलाफ में आऐ तो फरार हो जाताआर्थिक अपराधियों की दीपावली दिल्ली व पटियाला कोर्ट में मनाया जाता"
असा साधला निशाणा -निरज कुमार यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे... - "जो कहते थे कर देंगे खेला, विमान पर सवार हो लौट रहे देख कर मेला... मछली की जान लेकर भी जो जीत ना पाए, बड़े मायूस होकर प्रवासी कहलाये... कहाँ तो महीने का था प्रोग्राम, वोट भी ना मिल पाया कुछ ग्राम... क्या मुँह दिखलाते क्या हार का किस्सा बतलाते..."
आणखी एका ट्विटमध्ये, तुम्हाला भगवान श्रीकृणांचा श्राप लागला आहे. मग कोण वाचवणार, असे म्हणत निरज कुणार यांनी लिहिले आहे... - "जा रहे हैं तो जाइये, मगर आते रहिएगा बिहार...कृष्ण का श्राप लग गया आपको, फिर कौन बचाता...कुछ दिन बाद खुद कहियेगा कि पोस्टर में हमरा फोटो क्यों नहीं आता ?"