शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

Bihar News: "तेव्हा तुम्ही सोबत होता अन् आता..." विधानसभेत दिसला नितीश कुमारांचा रौद्रावतार; पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 1:39 PM

CM Nitish Kumar Slams BJP In Sadan: ''तुम्ही सगळे ड्रामा करताय...तुम्ही गलिच्छ काम करत आहात. हे सहन केले जाणार नाही. या सगळ्यांना बाहेर काढून द्या...''

Bihar Winter Session: बिहारमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांचे रौद्र रूप पाहायला मिळाले. छपरा येथे बनावट दारुमुळे सात जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर आजारी आहेत. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी या मुद्द्यावरून भाजपने (BJP) सभागृहात गदारोळ केला. 

मुख्यमंत्र्यांचे रौद्र रुपभाजपच्या गोंधळादरम्यान सीएम नितीश ताडकन उभे राहिले आणि भाजप आमदारांवर अचानक भडकले. त्यांनी भाजपवर सडकून टीका करत रौद्र रूप दाखवले. जेव्हा तुम्ही आमच्यासोबत होता, तेव्हा तुम्ही दारुबंदीच्या बाजूने होता आणि आता विरोधात. आता काय झाल? तुम्ही सगळे ड्रामा करताय...हे चुकीचं आहे. तुम्ही लोक गलिच्छ काम करत आहात. तुम्ही दारुडे आहात, तुम्ही दारू विकता. हे सहन केले जाणार नाही. या सगळ्यांना बाहेर काढून द्या...,' अशी टीका नितीश कुमार यांनी केली. 

भाजपचा गोंधळबिहार विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मंगळवारपासून सुरू झाले आहे. आज सभागृहाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व भाजप आमदार हातात पोस्टर घेऊन दारुबंदीविरोधात सरकारचा निषेध करत होते. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या रौद्रावतारानंतर भाजप आमदारांनी वेलमध्ये येऊन मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजपने मुख्यमंत्र्यांची भाषा अशोभनीय असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारBJPभाजपा