पाटणा:बिहारची राजधानी पाटणा येथील जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला आहे. 170 प्रवाशांना घेऊन पाटणा ते बंगळुरुला उड्डाण करणाऱ्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला. पार्किंग बे वरुन रनवेवर विमान नेत असताना तांत्रिक बिघाड वैमानिकाच्या लक्षात आला आणि मोठी दुर्घटना टळली.
नेमके काय झाले?मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी गो एअरचे विमान क्रमांक G8 874 पाटणा विमानतळावरुन बंगळुरुसाठी 12.35 वाजता टेक ऑफ करणार होते. टेक ऑफ करण्यासाठी वैमानिकाने विमान पार्किंग बेवरुन धावपट्टीवर नेले. यादरम्यान, विमानातील खराबी वैमानिकाला समजली. पायलटने ताबडतोब विमान नियंत्रणाला कळवले आणि नंतर पार्किंग बेमध्ये आणून उभे केले.
विमानातील दोष दुरुस्त केलाविमानात खराबी असल्याची माहिती ऐकून प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. त्याचवेळी विमानतळावर तैनात असलेल्या अभियंत्यांच्या पथकाने हा दोष तातडीने दुरुस्त केला. त्यानंतर हे विमान दुपारी 1.20 वाजता बंगळुरुसाठी रवाना झाले. मात्र, विमान कंपनी याला किरकोळ दोष म्हणत आहे.
यापूर्वीही घडली अशाप्रकारची घटनायापूर्वीच पाटणा विमानतळावर स्पाइसजेटच्या विमानाने धावपट्टीवरील टच पॉइंटला ओव्हरटेक केले होते. वेग जास्त असल्याने त्याचे चाक जिथे उतरायचे होते, त्या धावपट्टीच्या दीड मीटर पुढे उतरले. त्यावेळी वैमानिकाने समजूतदारपणा दाखवत तात्काळ हेवी ब्रेक लावून वेग कमी केला आणि विमानाचा तोल सांभाळला. जोरदार ब्रेक लागल्याने विमानात बसलेल्या प्रवाशाला जोरदार धक्का बसला, मात्र त्यानंतर सर्व काही सुरळीत झाल्यावर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.