खान सरांचा व्हिडिओ व्हायरल, होतेय अटकेची मागणी; 'सुरेश-अब्दुल' उल्लेख करत दिलं द्वंद्व समासाचं उदाहरण!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 12:42 PM2022-12-05T12:42:58+5:302022-12-05T12:44:40+5:30

Khan Sir : 'सुरेश आणि अब्दुल'चा उल्लेख करत खान सरांनी एक उदाहरण दिले आहे. याच व्हिडिओवरून हा वाद निर्माण झाला आहे.

Bihar patna Khan sir use Suresh-Abdul name as an example video viral congress demand for arrest | खान सरांचा व्हिडिओ व्हायरल, होतेय अटकेची मागणी; 'सुरेश-अब्दुल' उल्लेख करत दिलं द्वंद्व समासाचं उदाहरण!

खान सरांचा व्हिडिओ व्हायरल, होतेय अटकेची मागणी; 'सुरेश-अब्दुल' उल्लेख करत दिलं द्वंद्व समासाचं उदाहरण!

googlenewsNext

बिहारमधील पाटणा येथील प्रसिद्ध खान सरांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हारल होत आहे. यावरून काँग्रेस पक्ष सक्रिय झाला असून खान सरांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे. 'सुरेश आणि अब्दुल'चा उल्लेख करत खान सरांनी एक उदाहरण दिले आहे. याच व्हिडिओवरून हा वाद निर्माण झाला आहे.

काय आहे काँग्रेसचं म्हणणं -
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर खान सरांचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यासोबत त्यांनी, 'वाईट, खूपच वाईट - त्याला अटक करायला हवी आणि जे लोक त्याचे बोलणे ऐकूण अट्टहास करत आहेत, त्यांनी विचार करायला हवा, की आपण काय बनत आहोत? लेखक अशोक कुमार पांडे यांनीही ट्विट करत म्हटले आहे, की 'याला नीचतेची सीमा म्हणतात. असे लोक शिक्षणाचा धंदा करत समाजात द्वेश पसरवणारे घाणेरडे धंदेबाज आहेत. या माणसाला तत्काळ अटक व्हायला हवी.'

काय आहे व्हिडिओमध्ये - 
व्हिडिओमध्ये खान सर द्वंद समास समजावून सांगत आहेत. ते या समासाचे उदाहरण देताना म्हणत आहे, की 'समासात काही संधी अशा असतात, की एकाच गोष्टीचे दोन अर्थ होतात. त्याला द्वंद समास बोलतात ना? द्वंद समासात एका गोष्टीचे दोन अर्थ होतात. जसे, सुरेशने विमान उडवले... याचा अर्थ, सुरेशने विमान उडवले... द्वंद समासात आता फक्त याचे नाव बदला. अब्दुलने विमान उडवले."

पुढे ते म्हणाले, 'शब्द एकच आहे. पण यातील फरक वेगळा होऊन जाईल. सुरेशने विमान उडवले म्हणजे उडवले (हवेत उडवल्याची अॅक्शन करत), अब्दुलने जहाज उडवले म्हणजे, स्फोट केला (भडकवले, अशी अॅक्शन करत).'

Web Title: Bihar patna Khan sir use Suresh-Abdul name as an example video viral congress demand for arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.