पाटणा : २०१६ पासून दारूबंदी लागू असलेल्या बिहारमध्ये पुन्हा एकदा विषारी दारूने हाहाकार माजवला असून, मोतिहारी जिल्ह्याच्या विविध भागांत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. विषारी दारू घेतलेले अनेकजण अत्यवस्थ असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा प्रकार विषारी दारूने घडल्याचा नागरिकांचा आरोप आहे तर, जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे की, अन्नातून विषबाधा झाली आहे. जिल्हाधिकारी सौरभ जोरवाल यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी लक्ष्मीपूर परिसरात पहिली घटना समोर आली. खासगी रुग्णालयात रामेश्वर राम ऊर्फ जटा राम याचा मृत्यू झाला.
- मुजफ्फरपूर, मुशहर टोली येथील रुग्णालयांत प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला. - गीधा येथे तीन तर कौवाहा - येथे एकाचा मृत्यू झाला. - परिसरातील अनेक रुग्णालयांत अत्यवस्थ लोक दाखल झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.