शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

प्रियंका गांधींबाबत अश्लील ट्वीट करणाऱ्या तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 10:14 AM

काही दिवसांपूर्वी एका तरुणाने प्रियंका गांधींच्या छायाचित्राशी छेडछाड करुन ट्वीटरवर पोस्ट करुन अश्लील टिप्पणी केली होती. अश्लील ट्वीट करणाऱ्या तरुणाला बिहार पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी एका तरुणाने प्रियंका गांधींच्या छायाचित्राशी छेडछाड करुन ट्वीटरवर पोस्ट करुन अश्लील टिप्पणी केली होती. अश्लील ट्वीट करणाऱ्या तरुणाला बिहार पोलिसांनी अटक केली आहे.योगी सूरजनाथ असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून तो बिनोदपूरचा रहिवासी आहे.

नवी दिल्ली - प्रियंका गांधी यांची काँग्रेस सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याची घोषणा होताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. मात्र काही दिवसांपूर्वी एका तरुणाने प्रियंका गांधींच्या छायाचित्राशी छेडछाड करुन ट्वीटरवर पोस्ट करुन अश्लील टिप्पणी केली होती. अश्लील ट्वीट करणाऱ्या तरुणाला बिहार पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगी सूरजनाथ असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून तो बिनोदपूरचा रहिवासी आहे. अटक करण्यात आलेला तरुण सोशल मीडियावर स्वतःला मोदी भक्त असल्याचं सांगतो. मात्र, भाजपाने या व्यक्तीशी आपला कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. 30 जानेवारी रोजी सूरजनाथ याच्याविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते शाहीन सैय्यद यांनी ही तक्रार केली होती. बिहारच्या कटिहार येथून तरुणाला अटक करण्यात आली आहे. 

पुण्यामध्ये देखील अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी पुणे शहर महिला काँग्रेसने दोन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेस सरचिटणीस पदी नुकत्याच विराजमान झालेल्या गांधी यांच्या नावाने योगी संजय नाथ आणि ज्योती तिवारी या दोन फेसबुक अकाउंटवर आक्षेपार्ह्य मजकूर असल्याचे पुणे शहर महिलाध्यक्षा सोनाली मारणे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये बदनामी करून अब्रुनुकसानी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

प्रयागराजमध्ये प्रियंका गांधींचे पोस्टर्स ठिकठिकाणी लावण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी  ''गंगा की बेटी'' अशा आशयाच्या लावण्यात आलेल्या पोस्टरनंतर प्रियंका गांधी यांना दुर्गा अवतारात दाखवण्यात आलो होते. या पोस्टरमध्ये प्रियंका गांधी महिषासुराचा वध करताना दिसल्या होत्या. प्रियंका गांधी यांचे दुर्गा अवतारातील पोस्टर काँग्रेस नेते इरशाद उल्लाह आणि अनिल चौधरी यांनी लावले. या पोस्टरवर महिला सुरक्षा, महागाई, रोजगार, शेतकऱ्यांची कर्जमाफी, राम मंदिर, मुस्लिम-दलित सुरक्षा यांसारखे मुद्यांचाही उल्लेख करण्यात आला होता. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसPoliceपोलिसArrestअटकBiharबिहार